अँन्टी करप्शनलाच स्वीकारताना वेतन भविष्य निर्वाह निधी पथकची महिला अधिकारी जाळ्यात

लाच स्वीकारताना वेतन भविष्य निर्वाह निधी पथकची महिला अधिकारी जाळ्यात

spot_img
भविष्य निर्वाह निधी पथकच्या अतिरिक्त अधीक्षक मीनाक्षी गिरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार आणि त्यांची पत्नी हे धुळे येथील महानगरपालिका शाळेत विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहेत.

धुळे – शिक्षक पती, पत्नीचे थकीत वेतन देण्यासाठी दोन लाख रुपयाची लाच स्वीकारताना माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकच्या अतिरिक्त अधीक्षक मीनाक्षी गिरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार आणि त्यांची पत्नी हे धुळे येथील महानगरपालिका शाळेत विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे एप्रिल २०२२ ते ऑक्टोंबर २०२३ या कालावधीतील थकीत वेतन व सातव्या वेतन आयोगाचा तिसरा आणि चौथा हप्ता महाराष्ट्र शासनाच्या निर्णयान्वये मंजूर झाला आहे. परंतु, हे थकीत वेतन त्यांना मिळाले नाही.

या संदर्भात त्यांनी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकच्या अतिरिक्त अधीक्षक मीनाक्षी गिरी यांची भेट घेतली होती. तेव्हा तक्रारदार व त्यांची पत्नी यांना ही रक्कम देण्यासाठी गिरी यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली. या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.

कार्यालयात दोन लाख रुपये स्वीकारत असताना गिरी यांना पथकाने रंगेहात पकडले. त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सापळा परिवेक्षण अधिकारी सचिन साळुंखे यांनी तपासी अधिकारी रूपाली खांडवी यांच्यासह सापळा पथकातील राजन कदम, प्रशांत बागूल, प्रवीण पाटील यांनी ही कारवाई केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे!

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त...