गुन्हेगारीलाच मागितली एक कोटीची, तडजोडीअंती द्यायचे ठरले 30 लाख ; पण घात...

लाच मागितली एक कोटीची, तडजोडीअंती द्यायचे ठरले 30 लाख ; पण घात झाला, पाच लाख घेताना अँटी करप्शन विभागानं एकाला घेतलं ताब्यात …!

spot_img

आपल्या देशातल्या प्रत्येक सरकारी कार्यालयांमध्ये ‘लाच घेणं आणि लाच देणं गुन्हा आहे’, अशी स्टिकर्स चिटकवण्यात आलेली आहेत. भ्रष्टाचार नियंत्रणात आणण्यासाठी अँटी करप्शन विभाग कार्यरत आहे. रोज कुठे ना कुठे एसीबीचा ट्रॅप पडत असतो. मात्र तरीदेखील भ्रष्टाचार कमी व्हायचं नाव घेत नाही. भ्रष्टाचाराचा हा भस्मासूर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. राज्यातल्या बीड जिल्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या हरिभाऊ खाडे या लाचखोर पोलीस निरीक्षकानं एक कोटी रुपयांची लाच मागितली.

लाच घेण्याच्या या प्रकरणात तडजोडीअंती तीस लाख रुपयांची लाच घेण्याचं ठरलं. मात्र यापैकी पाच लाख रुपये घेताना कुशल जैन या खासगी इसमाला अँटी करप्शन विभागानं ताब्यात घेतलं. आर्थिक गुन्हे शाखेचा सहाय्यक फौजदार रवी भूषण जाधवर याचादेखील या लाच प्रकरणात सक्रिय सहभाग आहे.

या लाचखोर प्रकरणातले तक्रारदार आणि त्यांचा सहकारी अशा दोघांनी मांसाहेब जिजाऊ मल्टीस्टेट बँकेचे संस्थापक संचालक बबन शिंदे यांच्या शाळेच्या इमारतीच्या बांधकामाला साहित्य पुरवलं होतं. या मोबदल्यात बबन शिंदे यांनी तक्रारदार आणि त्याच्या सहकार्याला सहकारी साथीदाराला साठ लाख रुपये दिले होते. विशेष म्हणजे बबन शिंदे याच्याविरुद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बँक अपहारप्रकरणी गुन्हा दाखल असून त्याचा तपास पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे हे करत आहेत.

बबन शिंदे यांनी दिलेली 60 लाख रुपये रक्कम बँकेच्या अपहारातली असल्याचं भासवून तक्रारदार आणि साक्षीदारांची मालमत्ता जप्त करण्याची भिती दाखवत पोलीस निरीक्षक खाडे यानं एक कोटी रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती 30 ला घेण्याचे ठरलं. मात्र त्यातले पाच लाख रुपये घेताना कुशल जैन या खासगी इसमाला अटक करण्यात आली.

… तरीही भ्रष्टाचार बंद होणार नाही…!

लाच घेणं आणि लाच देणं, ही अक्षरं फक्त आपल्या देशात आणि राज्यात असलेल्या सरकारी कार्यालयांच्या भिंतीवरच शोभून दिसताहेत. प्रत्यक्षात या घोषवाक्यानुसार कोणीच आचरण करत नाही. सरकारी कार्यालयांतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाढत असलेला हावरटपणा हाच भ्रष्टाचाराला कारणीभूत आहे. हा कधीच कमी होणार नाही. त्यामुळे स्वर्गातून ब्रह्मदेव जरी आले तरी आपल्या देशातला भ्रष्टाचार बंद होणार नाही, हे सूर्यप्रकाशाइतकं प्रखर सत्य आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा…! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर बाणा आणि अभ्यासू आमदार अमित गोरखे यांचा तगडा पाठपुरावा…!

... अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा...! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर...

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...