खरेदी केलेल्या शेतीची रजिस्ट्री करण्यात आल्यानंतर फेरफार पाहण्यासाठी तलाठ्यानं तक्रारदाराला दोन हजार रुपये लाच मागितली. त्यानंतर काही दिवसांनी भंडारा जिल्ह्यातल्या नेरला गावच्या तलाठ्याला दोन हजार रुपयांपैकी एक हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं. रविंद्र पडोळे असं त्या लाचखोर तलाठ्याचं नाव आहे.
तक्रारदारानं भंडारा जिल्ह्यातल्या पवनी इथं शेती खरेदी केली होती. त्या शेतीचे फेरफार पाहण्यासाठी अड्याळ जवळच्या नेरला इथं तक्रारदारानं पडोळे तलाठ्याची भेट घेतली. त्यानंतर पडोळे तलाठ्यानं तक्रारदाराला दोन दिवसांनी दोन हजार रुपये द्यायला सांगितले. याप्रकरणी पडोळे तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.