लेटेस्ट न्यूज़लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक...

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

spot_img

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

नगर (प्रतिनिधी)- वडगाव गुप्ता (ता. नगर) हद्दीतील सरकारी जागेत अनेक वर्षांचे अतिक्रमण असलेल्या अनुसूचित जाती-जमाती व भटक्या, विमुक्त प्रवर्गातील कुटुंबीयांचे अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली त्यांना बेघर केले असून त्यांना त्या ठिकाणी  पुनर्वसन एका बाजूस करण्याच्या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देताना लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र राज्य सदस्य संजय वाल्हेकर, अहिल्यानगर जिल्हा प्रमुख सुनील शिंदे, जिल्हा समन्वयक किरण कणगरे, सिताराम शिरसाठ, पिनू भोसले, नाना जगताप, सोमनाथ जाधव, सोनू शिंदे, शिवानी माळी, गोपीनाथ शिंदे, सोनू भोसले, ऋतिक भोसले, ओंकार भोसले, बिरकी काळे आदीसह बेघर कुटुंबीय उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हंटले आहे की,
वडगाव गुप्ता (ता. नगर) येथील महाराष्ट्र शासनाच्या गट नंबर ५९५/१ मधील शासकीय मोकळ्या जागेवर गेल्या २५ ते ३० वर्षांपासून अनुसूचित जाती-जमाती व भटक्या, विमुक्त प्रवर्गातील नागरिक राहत आहे. काही कुटुंबीय पक्के घर करून, तर काही झोपड्यात राहत आहे. त्यांना वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीने नळ कलेक्शन दिले असून, ते पाणीपट्टी देखील ते भरत आहे. त्याचप्रमाणे विद्युत महावितरण मार्फत त्यांना लाईट मीटर घेण्यात आले असून, त्याचे बिल देखील ते अदा करत आहेत. अनेक वर्षापासून वास्तव्य असल्याने त्यांचे मतदार यादीतही नाव समाविष्ट असून, नुकतेच त्यांना नोटीसद्वारे जागा खाली करण्याचे सांगण्यात आले आहे. अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली हा उपेक्षित वर्ग बेघर केले व अतिक्रमण काढताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्राची विटंबना झालेली आहे त्यामध्ये तपास करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच त्यामध्ये विविध जाती धर्माच्या लोकांची घरे पाडून त्यांना बेघर करण्यात आलेले आहे त्याची फार दैनिक अवस्था झालेली असून उपासमारीची वेळ आली आसून ज्या पद्धतीने ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्थानिक लोकांच्या नावावर ती जागा केलेली आहे त्याच पद्धतीने अतिक्रमण धारकांना त्यामध्ये २ हेक्टर क्षेत्र शिल्लक असून त्यामध्ये अतिक्रमण धारकांना विचारात घेऊन पुनर्वसन करावा अन्यथा गुरुवारी २४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व कुटुंबीयांसमवेत बिरहाड आंदोलन करणार निवेदनात म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे!

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त...