लहुकन्या सौम्या महादेव सोनवणे यांच्या सारख्या शेकडो युवतींना स्वरंक्षणार्थ धडे देणार – लोकसेवक युवराज दाखले.
पिंपरी -प्रतिनीधी, नरेश सुर्या क्लासिक 2025 अंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धाचे आयोजन डब्लउ यस फिटनेस क्लबचे ट्रिपल महाराष्ट्र विजेते वसीम शेख व त्यांचे सहकारी टिपुसुलस्तान पठाण यांनी ग दी माडगुळकर सभागृह आकुर्डी या ठिकाणी आयोजित केलं होतं.
दिपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज व बजरंग बली यांच्या प्रतिमेचे पूजन लोकसेवक युवराज दाखले, वसीम शेख, नरेश सुर्या व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या स्पर्धेत महाराष्ट्रातुन व महाराष्ट्रा बाहेरून शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दरम्यान याठिकाणी लहुकन्या सौम्या महादेव सोनवणे या इयत्ता सातवी मधील युवतीने नानचाकु,व शिवकालीन शस्त्रेंची प्रात्यक्षिक सादर केले यावेळी उपस्थित सहकार्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
यावेळी जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे,शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले,मावळ लोकसभा अध्यक्ष कृष्णा साबळे, खेड तालुका अध्यक्षा उषाताई कांबळे, अनिल तांबे,अमन शेख, सोमनाथ सोनवणे महादेव सोनवणे, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.