श्रीगोंदे :- नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनाच भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने पारनेर चे आमदार निलेश लंके यांना खासदार शरद पवार यांनी राजकिय डावपेच टाकत अन् विखे यांना तोडीसतोड म्हणून लंके यांना उमेदवारी दिली . त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार खा सुजय विखे पाटील यांचे कमळ फुलणार का आमदार निलेश लंके यांची तुतारी वाजणार हे येत्या काही दिवसातच समजेल .
श्रीगोंद्यातील राजकीय समीकरणात वेगाने घडामोडी होत आहे कारण श्रीगोंदे तालुक्या शेजारी पारनेर तालुका आहे आणि विविध राजकीय,सांस्कृतिक कार्यक्रम असो की उपोषण, आंदोलने , छोटे मोठे उद्घाटन असो आमदार निलेश लंके हे आवर्जून उपस्थित राहतात येथे त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.
आपल्या विरोधात आमदार निलेश लंकेच उभे राहतील हे हेरून खा.डॉ.सुजय विखे यांनी गेल्या ४ महिन्यात श्रीगोंदे तालुक्यात जास्त लक्ष दिले, साकळाई उपसा जलसिंचन योजना असो की एमआयडीसी यात विखे यांनी लक्ष घातले .रस्ते,विविध शासकीय योजनांच्या पूर्ततेसाठी श्रीगोंदे तालुक्यात लक्ष दिले , जोडीला भाजप आमदार बबनराव पाचपुते यांच्या कार्यकर्त्यांना ताकद दिली .
वेळी अभावी हेलिकॉप्टर मधून ऐनवेळी दौरे केले पण कार्यक्रम चुकवला नाही त्यांच्या अपेक्षे प्रमाणे लंके हेच उमेदवार असतील म्हणून श्रीगोंदे लक्ष्य केले तर दुसरीकडे लंके यांच्या पक्षीय पातळीवर माजी आमदार राहुल दादा जगताप यांची यंत्रणा आणि लंके यांचा श्रीगोंद्यातील जनसंपर्क ,चाहता वर्ग वगळता अन्य ठिकाणी पोहोचणारी यंत्रणा नाही , तुलनेत खा.विखे यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांचे म्हणजेच आमदार बबनराव पाचपुते यांचे कार्यकर्ते अशी प्रचाराची मोठी यंत्रणा आहे शिवाय गावोगावी विखे – पाचपुते कार्यकर्ते असल्याने लंके यांना सोशल मीडिया वगळता तळागाळात जाणाऱ्या कार्यकर्त्यांची नक्कीच फौज उभी करावी लागेल .
माजी आमदार राहुल जगताप वगळता महा विकास आघाडी मधील काँग्रेस पक्षात प्रशांत दरेकर आणि माजी नगराध्यक्ष काँग्रेस नूतन शहराध्यक्ष मनोहर पोटे आणि शिवसेना उ भा ठा उपनेते काष्टी चे सरपंच साजन पाचपुते,तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे यांचे कार्यकर्ते असे बला बळ असून लंके यांच्या कोव्हिड काळात झालेल्या कामातून प्रभावित झालेल्या समर्थकांची भर पडली ते कार्यकर्ते प्रचाराची धुरा सांभाळतील असे दिसते.
तालुक्यात महायुती मध्ये भाजप आमदार बबनराव पाचपुते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र नागवडे आणि त्यांच्या पत्नी जिल्हा सहकारी बँक संचालिका सौ.अनुराधा नागवडे,राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा,विखे समर्थक जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे , माजी जिल्हा परिषद अर्थ बांधकाम समिती सभापती बाळासाहेब गिरमकर,सुभाष डांगे, अशी मंडळी असून नेते मंडळींच्या भाऊगर्दी मुळे प्रचारात चुरस निर्माण होणार आहे .
बीआरएस नेते घनश्याम शेलार हे देखील इच्छुक असल्याचे बोलले जात असल्याने त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे उमेदवारी केली तर कोणाच्या पथ्यावर पडते हे येणारा काळच ठरवेल.