युवा विश्वरोटरी क्लब अहमदनगर प्रियदर्शिनीच्या नवीन संचालक मंडळाची निवड. रो. मिनल बोरा...

रोटरी क्लब अहमदनगर प्रियदर्शिनीच्या नवीन संचालक मंडळाची निवड. रो. मिनल बोरा यांची अध्यक्षपदी तर रो. स्वाती गुंदेचा यांची मा. सचिवपदी निवड.

spot_img

अहिल्यानगर: रोटरी क्लब ऑफ अहमदनगर (अहिल्यानगर) प्रियदर्शिनीने २०२४-२५ या रोटरी वर्षासाठी आपले नवीन संचालक मंडळ जाहीर केले आहे. या संचालक मंडळात रो. मिनल ईश्वर बोरा यांची अध्यक्ष म्हणून तर रो. स्वाती महेश गुंदेचा यांची मानद सचिव म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीची स्थापना २००२ साली झाली आहे आणि गेल्या २२ वर्षांपासून हा क्लब रोटरीची उद्दिष्ट साधत समाजाच्या कल्याणासाठी अविरतपणे कार्यरत आहे. क्लबने विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. विविध चालू आणि प्रभावी प्रकल्पांद्वारे प्रियदर्शिनी क्लबने अनेक वंचित आणि कमी भाग्यवान लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत.

नवीन संचालक मंडळात खालील सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे: अध्यक्ष – मिनल ईश्वर बोरा, सचिव व क्रीडा – स्वाती महेश गुंदेचा, खजिनदार – प्रभा खंडेलवाल, सहसचिव – शुभा बोगावत, Ipp व क्लब इमेज, ग्लोबल ग्रांट – देविका रेले, क्लब प्रशासक – माधुरी सारडा, क्लब प्रशिक्षक – नीना मोरे, TRF – यास्मिन जलनवाला, मेंबरशिप डेवलपमेंट – प्रतिभा धूत, आंतरराष्ट्रीय सेवा – रिटा झंवर, RI व डिस्ट्रिक्ट एम्फेसिस – ऍड. नीलमणी गांधी, सार्जेंट ऐट आर्म्स – ज्योती गांधी, वैद्यकीय संचालक – डॉ. स्मिता तरडे, कम्युनिटी सर्व्हिस – सविता काळे, यूथ सर्व्हिस – आरती लोहाडे, व्होकेशनल सर्व्हिस – कुंदा हलबे, पर्यावरण सेवा – मंजू मुनोत, बुलेटिन संपादक – विभा तांबडे, लिटरेसी चेअर – गीता गिल्डा, WINS चेअर – डॉ. ममता डुंगरवाल, CSR – आशा फिरोदिया, IT सेवा – डॉ. स्वाती चंगेडिया, कल्चरल – सुरेखा मिनियार, सल्लागार – छाया फिरोदिया.

नवीन अध्यक्ष मिनल ईश्वर बोरा या रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचे माजी अध्यक्ष रो. ईश्वर अशोक बोरा यांच्या पत्नी आहेत. रो.ईश्वर बोरा यांनी त्यांच्या सचिवीय कार्यकाळात संपूर्ण रोटरी जिल्हा ३१३२ मध्ये सर्वोत्तम सचिव पुरस्कार आणि अध्यक्षीय कार्यकाळात सर्वोत्तम अध्यक्ष पुरस्कार मिळवला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने व प्रियदर्शिनी क्लबच्या सर्व माजी अध्यक्षांच्या मार्गदर्शनाने मिनल बोरा यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात निश्चितच मदत होईल. सर्वांच्या सहकार्याने प्रियदर्शिनीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात जास्तीत जास्त समाजकार्य करण्याचा मानस त्यांनी यावेळी उपस्थितांसमक्ष बोलून दाखवला आणि अनेक समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेण्याची घोषणा केली.

हे संचालक मंडळ रोटरी क्लबच्या विविध सामाजिक आणि सामुदायिक प्रकल्पांच्या माध्यमातून अहमदनगर शहरात सेवा देण्यास तत्पर आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे प्रांतपाल रो. डॉ. सुरेश साबू, जिल्हा सचिव रो. डॉ. नितीन खंडेलवाल यांच्यासह क्लबच्या सर्व सदस्यांनी नवीन अध्यक्ष आणि संचालक मंडळाला हार्दिक शुभेच्छा दिल्या व आगामी वर्षात सामाजिक योगदानासाठी एकत्र येण्याचे वचन दिले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...