गुन्हेगारीअहिल्यानगर जिल्ह्यात रेशन माफिया व पुरवठा विभागातील भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमतानेच चालतो...

अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन माफिया व पुरवठा विभागातील भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमतानेच चालतो धान्याचा काळाबाजार? सखोल चौकशी करून मोक्का अंतर्गत कारवाई होईल का?

spot_img

अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन माफिया व पुरवठा विभागातील भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमतानेच चालतो धान्याचा काळाबाजार?

अहिल्यानगर –  अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन कार्डधारकांची संख्या 2,25,342 आहे, ज्यावर 11,39,142 लाभार्थी आहेत. एवढी मोठी लाभार्थ्यांची संख्या असल्याने धान्य काळाबाजाराचा व्याप सुद्धा तेव्हढाच मोठा आहे. याकडे जिल्हा पुरवठा विभागाचे जाणीवपूर्वक अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या ह्या कृत्यामुळे गोरगरीबांच्या धान्यावर रेशन माफिया मात्र घुशी सारखे पोसले जात आहे.

रेशनवरील धान्य खुल्या बाजारात विकून त्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावण्याचा गोरखधंदा राज्यभर चांगलाच फोफावताना दिसत आहे. या मध्ये अहिल्यानगर सुध्दा मागे नाही. गावोगावी रेशनचे धान्य खरेदी करणारे ठेकेदार फिरताना दिसतात. या प्रकारामुळे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या मूळ उद्देशाला खुलेआम हरताळ फासला जाताना दिसत आहे.

रेशनच्या धान्यावर हॉटेल आणि धाब्यांची चंगळ!
रेशनवरील तांदूळ आणि गहू एजंट लोक साधारणत: पंधरा रुपये प्रतिकिलो या दराने खरेदी करतात आणि तोच तांदूळ-गहू हॉटेल आणि धाबाचालकांना बाजारभावापेक्षा काहीशा कमी दराने विकताना दिसतात. राज्यातील अनेक हॉटेल्स आणि धाबे या रेशनवरील धान्याच्या जोरावरच चंगळ करताना दिसताहेत. काही भागांत रेशनवरील धान्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करण्याचे छोटे-मोठे ‘उद्योग’ सुरू आहेत. रेशनवरील तांदळात कसल्यातरी सुगंधी पावडरी मिसळून त्याचे बासमती तांदळात रूपांतर करण्याची किमयासुद्धा काहीजणांनी साध्य केलेली आहे. अन्न व औषध प्रशासनाने या अशा उद्योगांची चौकशीची आवश्यकता आहे.

रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार हा एक गंभीर सामाजिक आणि आर्थिक समस्या आहे. यात शासकीय स्वस्त धान्य दुकानांमधून (रेशनिंग दुकाने) दिले जाणारे धान्य, ग्राहकांना न देता किंवा कमी प्रमाणात देऊन, जास्त किमतीत खुल्या बाजारात विकले जाते. काळ्या बाजारात धान्य विकण्याचे अनेक मार्ग आहेत, जसे की:
दुकानादार व पुरवठा निरीक्षक मिलीभगत: काही दुकानदार ग्राहकांना धान्य देण्यास टाळाटाळ करतात किंवा त्यांना कमी प्रमाणात धान्य देतात. नंतर तेच धान्य जास्त किमतीत काळ्या बाजारात विकतात. यामध्ये पुरवठा निरीक्षक दप्तर तपासताना कर्तव्यात कसूर करतात.
खोट्या पावत्या: काही दुकानदार खोट्या पावत्या बनवून, धान्य वाटप झाल्याचे दाखवतात, पण प्रत्यक्षात ते धान्य काळ्या बाजारात विकले जाते.
साठवणूक आणि तस्करी: काही लोक मोठ्या प्रमाणात धान्य साठवून ठेवतात आणि नंतर त्याची तस्करी करतात.

या समस्येचे दुष्परिणाम:
गरिबांना त्रास: गरीब आणि गरजू लोकांना स्वस्त दरात धान्य मिळत नाही, त्यामुळे त्यांना उपासमारीचा त्रास होतो.
सरकारचे नुकसान: सरकारला धान्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात,  ते धान्य योग्य लोकांपर्यंत न पोहोचता थेट काळ्या बाजारात जाते.
गुन्हेगारी वाढते: काळाबाजारामुळे अनेक गैरव्यवहार आणि गुन्हेगारी वाढते.

रेशनकडून बासमतीकडे! – गावोगावी रेशनवरील धान्य खरेदी करणार्‍या एजंटांची फार मोठी साखळी निर्माण झालेली आहे. काही ठिकाणी तर रेशन दुकानांच्या शेजारीच ते धान्य नाममात्र दराने खरेदी करणारी दुकाने थाटलेली आहेत. इकडून मोफत धान्य घ्यायचे आणि पलीकडच्या दुकानात जाऊन ते विकून टाकायचे, असे प्रकार सुरू आहेत. असे धान्य खरेदी करणारे लोक याच धान्यावर थोडीफार प्रक्रिया करून तेच धान्य पुन्हा खुल्या बाजारात दुप्पट ते दसपट दराने विकत असल्याचे समोर आले आहे. यापैकी काही बहाद्दर तर रेशनवरील तांदूळ सुगंधी पावडरचा वापर करून बासमती राईस म्हणून अव्वाच्या सव्वा दराने विकत आहेत.

त्रुटी दूर करण्याची गरज!
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना अतिशय चांगल्या हेतूने सुरू करण्यात आली आहे; पण गेल्या काही वषार्र्ंत या योजनेचा ‘अवघा बाजार’ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे योजनेच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जात आहे. त्यामुळे या योजनेतील त्रुटी दूर करून लोकांना चांगल्या दर्जाचे धान्य पुरविण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून या योजनेतील धान्याला खुल्या बाजारात पाय फुटणार नाहीत; अन्यथा या योजनेच्या नावाखाली भलतीच मंडळी गब्बर होत जाण्याचा धोका आहे.

या समस्येवर उपाय:

मोक्का अंतर्गत कारवाई: काळ्या बाजारात धान्य विकणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी असल्याने मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी.

तंत्रज्ञानाचा वापर: धान्य वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे, जसे की ऑनलाइन प्रणाली आणि बायोमेट्रिक ओळख.
जागरूकता: ग्राहकांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे आणि त्यांना तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून देणे. तसेच आपल्या भागातील रेशन काळया बाजाराविषयी माहिती असल्यास महासत्ता भारत न्यूज च्या 8329405191 या व्हॉट्स अँप वर सुध्दा पाठवू शकता.

या समस्येवर प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे, जेणेकरून गरीब लोकांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळू शकेल आणि सरकारचे नुकसान टळेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...