गुन्हेगारीरेशन माफिया पुन्हा झालेत सक्रिय...! जिल्हा पुरवठा विभाग घेणार का 'ॲक्शन'?

रेशन माफिया पुन्हा झालेत सक्रिय…! जिल्हा पुरवठा विभाग घेणार का ‘ॲक्शन’?

spot_img

रेशन माफिया पुन्हा झालेत सक्रिय…! जिल्हा पुरवठा विभाग घेणार का ‘ॲक्शन’?

महासत्ता भारत / अहिल्यानगर

गोरगरिबांच्या हक्काचं धान्य काळ्या बाजारात विकण्यासाठी रेशनिंग दुकानदारांना हाताशी धरुन बक्कळ पैसा मिळविण्यासाठी रेशन माफिया पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. अहिल्या नगर जिल्ह्याचा जिल्हा पुरवठा विभाग या रेशनमाफियांविरुद्ध कारवाई करणार का? हाच मोठा प्रश्न आहे.

राज्य शासन गोरगरिबांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत आहे. मात्र ज्यांच्या माध्यमातून या योजना राबवल्या जात आहेत, तेच या योजनेत स्वतःच्या तुंबड्या भरुन घेत आहेत. अहिल्यानगरच्या रेशनिंगचा माल थेट नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बारामती, वाशी आणि गुजरातला व कर्नाटक राज्यात जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

शासकीय योजनेचे रेशन वाटपात बायोमेट्रीक प्रणाली असली, तरी सदस्य संख्येनुसार धान्यांचा कोटा असल्याने सर्व सदस्यांचे धान्य न देत काही सदस्यांचेच देऊन त्यातून दुकानदार धान्यांची चोरी करीत आहेत. रेशनकार्ड, सदस्यांचा धान्याचा कोटा वारंवार बदलत असल्याने प्रत्येक रेशनकार्डधारक दर महिन्यात शासनाकडून सदस्यनिहाय, कार्डनिहाय किती धान्य आले? आपल्याला दुकानदारांनी किती दिले? याचे काटेकोरपणे स्पष्टीकरण मागत नाहीत. ग्रामीण आणि शहरातील उपनगर, झोपडपट्टीतील अनेक दुकानात रेशन नेण्यासाठी अल्पशिक्षीत, ज्येष्ठ नागरिक येतात. ते बायोमेट्रीक करायचे आणि दुकानदार देईल, तितके धान्य घेऊन जातात. कार्डधारकांचे चोरलेले धान्य दुकानदार काळ्या बाजारात विकत असल्याची माहिती कळत आहे.

रेशनचे धान्य बाजारात आणणारे दलाल रेशनचे धान्य काळ्या बाजारात विकण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांकडून धान्य गोळा करणारे दलाल सक्रिय झाले आहेत. कमाई चांगली असल्याने या दलालांनी पुन्हा उप दलालांची नियुक्ती केली आहे.

नवे एजंट सक्रिय कोल्हापूर शहरातील अहिल्यानगर जिल्ह्यातील रेशनकार्ड आणि धान्यासंंबंधीची कामे करून देण्याच्या दलालांच्या टोळीत अशोक, गजानन, अरुण हे नवे एजंट सक्रिय झाले आहेत. याच्यावर सध्या पुरवठा प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांना हप्ते गोळा करून देण्याची जबाबदारी आहे.

रेशनकार्डमधील पत्ता बदलासाठीही हेलपाटे मारायला लावले जाते. यासाठी दोन ते पाच हजार रुपयांची मागणी केली जाते. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन पुरवठा विभागातील लाचखोरीला आळा घालावा.

कर्नाटक सीमा भागातील रेशनमधील गहू, तांदूळ राष्ट्रीय महामार्गच्या दोन्ही बाजूला असलेल्या धाब्यावर विकला जातो. सीमेलगतच्या गावातील स्वस्त धान्य दुकानातून धाबे, हॉटेलवाले शनिवारी, रविवारी घेऊन धान्य घेऊन जातात. – एक सजग नागरिक, सीमाभाग.

या दुष्टचक्रात जे जे अडकले आहेत, त्या सर्वांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणी ‘ॲक्शन मोड’वर येतील का, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या रेशन माफियांच्याविरुद्ध कठोर कारवाई महाराष्ट्र शासन करील का, या प्रश्नांची उत्तरं मिळावीत, अशी अपेक्षा अहिल्यानगर जनता व्यक्त करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन माफिया व पुरवठा विभागातील भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमतानेच चालतो धान्याचा काळाबाजार? सखोल चौकशी करून मोक्का अंतर्गत कारवाई होईल का?

अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन माफिया व पुरवठा विभागातील भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमतानेच चालतो धान्याचा काळाबाजार? अहिल्यानगर...

अहिल्यानगर जिल्हापरिषदेचा अधिकारी लाच घेताना रंगेहात पकडला..!

यशस्वी सापळा कारवाई ▶️ युनिट - अहिल्यानगर. ▶️ तक्रारदार- पुरुष,वय-60 वर्षे ▶️ आरोपी - अशोक मनोहर शिंदे,...

स्वच्छतेच्या माध्यमातून अहिल्यानगर शहराची स्वतंत्र ओळख निर्माण होईल: आमदार संग्राम जगताप प्रत्येक नगरकराने शहर स्वच्छतेची जबाबदारी घ्यायला हवी: आयुक्त यशवंत डांगे

स्वच्छतेच्या माध्यमातून अहिल्यानगर शहराची स्वतंत्र ओळख निर्माण होईल: आमदार संग्राम जगताप प्रत्येक नगरकराने शहर स्वच्छतेची...