ब्रेकिंगरिपाई आंबेडकर पक्ष व समस्त भीमसैनिकाच्या वतीने परभणीच्या घटनेचा शहरातून मोर्चा.... पोलीस...

रिपाई आंबेडकर पक्ष व समस्त भीमसैनिकाच्या वतीने परभणीच्या घटनेचा शहरातून मोर्चा…. पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू पावलेला सोमनाथ सूर्यवंशी यांना मारणाऱ्या पोलिसांवर मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी!

spot_img

रिपाई आंबेडकर पक्ष व समस्त भीमसैनिकाच्या वतीने परभणीच्या घटनेचा शहरातून मोर्चा….
पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू पावलेला सोमनाथ सूर्यवंशी यांना मारणाऱ्या पोलिसांवर मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी!

नगर (प्रतिनिधी)- परभणी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिमेची मोडतोड करणाऱ्या समाजकंटकास व इतर गुन्हेगारास देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी व पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू पावलेला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यास चौकशी करून अटक करण्यात यावी व मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपाई आंबेडकर पक्ष व समस्त भीमसैनिकाच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला व कोतवाली पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक यांना निवेदन रोहित आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे निवेदनात म्हटले आहे की, परभणी येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिमेची तोडफोड करून समस्त आंबेडकरी अनुयायाची भावना दुखावली गेली.

एलएलबी शिक्षण घेणाऱ्या व शांततेच्या माध्यमाने आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकास ताब्यात घेऊन त्याला अटक केली. त्यास अमानुषपणे मारहाण करण्यात आली व त्याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला.

त्यामुळे मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी व मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये शासनाने मदत जाहीर करावी व कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्या नगर जिल्हा परिषदेत प्रशासनाची मनमानी; पात्र ठेकेदार कंपनीला डावलून अपात्र कंपनीला दिलं काम…!

अहिल्या नगर जिल्हा परिषदेत प्रशासनाची मनमानी; पात्र ठेकेदार कंपनीला डावलून अपात्र कंपनीला दिलं काम...! महासत्ता...

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना (आदिवासी विकास विभाग) तसेच महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार; मंत्रिमंडळ निर्णय

अजित केसराळीकरांच्या मागणीला आले यश…. मंगळवार, दि. ३ जून २०२५ रोजी मंत्रिमंडळ निर्णय महाराष्ट्र राज्य अनुसूचित...

तब्बल ३३ वर्षांनंतर आमदार अमित गोरखे यांच्या निधीतून पिंपरी-भाटनागर येथील बौद्ध विहाराचे सुशोभीकरण…  नूतन धम्मविहाराचे उद्घाटन मंगलमय वातावरणात संपन्न..!

तब्बल ३३ वर्षांनंतर आमदार अमित गोरखे यांच्या निधीतून पिंपरी-भाटनागर येथील बौद्ध विहाराचे सुशोभीकरण...  नूतन...

2 दरोडे व 4 घरफोडीच्या गुन्हयात फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद… आरोपीकडून 1,19,000/-रू किं.मुद्देमालासह 5 घरफोडीच्या गुन्हयांची उकल!

2 दरोडे व 4 घरफोडीच्या गुन्हयात फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद... आरोपीकडून 1,19,000/-रू किं.मुद्देमालासह...