नगर – आज दक्षिण लोकसभेचा धक्कादायक निकाल लागलेला आहे. यामध्ये उमेदवाराच्या पराजयामध्ये काही असंतुष्ट, नेतृत्वहीन, कार्यशुन्य लोकांचा हात आहे. यामध्ये लोढा सारखे 420 गुन्ह्यात सहभाग असणारे लोक या पराजय झालेल्या उमेदवाराच्या पाठीशी होते. म्हणुन जनतेने या उमेदवाराला नाकारले. ही 420 गुन्ह्यातील मंडळी ज्यापण उमेदवाराच्या पाठीशी असतात त्यांचा पराजय होतो. तसेच लोढा व आगरकर ही मंडळी आज प्रत्येक विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवारांच्या घरी जाऊन उमेदवारी मागतात. मागील निवडणुकीत यामुळे आगरकराचा पराभव सुद्धा झालेला आहे, असे आरोप शिव राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी पत्रकार परिषदेत केले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष विशाल जाधव, महिला प्रमुख अर्चना परकाळे, युवा प्रमुख शंभु नवसुपे आदि उपस्थित होते.
तसेच या लोकांच असे म्हणणे आहे की, 1992 ते 1998 मध्ये यांच्या सौभाग्यवती नगराध्यक्ष या पदावर असताना शहराचा विकास केला. या ठिकाणी यांची कारकीर्द सांगायची तर सक्कर चौक ते लालटाकी रस्ता फक्त आणि फक्त कागदोपत्री झालेला रस्ता आहे. याचे लाखो रुपये मलीदा यांनी खाला. यामुळे 1998 नंतर लोढांकडे आज पावेतो कुठलेही पद न आल्याने या नैराश्यातून ही मंडळी असे बिनबुडाचे आरोप करत आहे. यांना स्वगृही सुध्दा किंमत नाही.
तसेच या आधी विधानसभा लढविण्यासाठी ही मंडळी मनसेत सुध्दा गेली; तिथे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अचानक यांनी माघार घेतली. मग यांना माघार घ्यायचे काही पैसे भेटले का? या आधी भाजप कार्यालयात यां दोघांना पैसे घेतात म्हणून श्रीमुखात खावी लागलेली आहे.
आगरकर साहेब आज ज्या विशाल गणपती मंदिराचे अध्यक्ष आहेत. त्या मंदिराचे काम आम्ही लहानपणापासून ते आत्ता चाळीस-पन्नास वर्षाचे झालो तरी ते काम अद्याप पर्यंत चालूच आहे. त्यांना ज्या पद्धतीने या मतदारसंघात नवीन उमेदवार म्हणून पंकजाताई मुंडे लागतात तसेच त्यांनी विशाल गणपती अध्यक्षपद आता दुसर्या द्यावे, कारण बरीच वर्षे झाले त्यांचे वडिलोपार्जित पद त्यांच्याकडेच आहे. तसेच त्यांना नगरची गुंडगिरी वाढलेली दिसते खरी गुंडगिरी त्यांनी आगरकर मळ्यापासूनच सुरू केली. दोन गुंठे जागेचा व्यवहार होऊन सुद्धा वर्मा या व्यक्तीस पुन्हा दोन गुंठे जागा परत मागे घेतली आणि न दिल्यास जीवे मारू अशी धमकी दिली. शेवटी वर्मा ने न्यायालयात धाव घेतली मग आगरकर यांच्यावर फौजदारी दाखल करा असा, आदेश न्यायालयाने दिला. मग नगर शहरातली खरी गुंडगिरी कुठून सुरू झाली हे सांगायला नवीन नाही .
तरी यांना आमचे सांगणे आहे, की आगरकरांनी उमेदवारी करावी. आम्ही त्यांचा प्रचार करू फक्त ते ज्येष्ठ आहेत म्हणून. या दोघांनी विनाकारण आरोप करणे सोडावे व शहराचे वातावरण बिघडू नये याची काळजी घ्यावी.
तसेच आज नगर शहराला गेली 25 वर्षा पासुन विकासाला वंचित ठेवणार्यांनी स्वर्गिय अनिल भैय्यांना पण यांनी बोटे मोडुन विरोध केला. स्वर्गिय दिलीपजी गांधी यांना पण यांचा नगर अर्बन बँक ते खासदारकीला व मंत्री पदाला विरोध होता. हे दोघे कधीच खासदार गांधी यांचा उंबरा चढले नाही. वारंवार जनता तुम्हाला नाकारते आहे. हे लक्षात येऊन द्या, निवडणूक आली की तुम्ही शहराची शांतता भंग करता. तुम्ही ज्येष्ठ आहात याच भान ठेवा. हेच हिंदूचे मोर्चा काढतात आणि हेच भाजपचा उमेदवार पाडुन विविध रंगाचे गुलाल उधळण्यास कारण ठरतात.
शहराची शांतता कै.जगदिश भोसले यांची हत्या झाल्यापासून भंग झालेली आहे. त्यावेळी तुम्ही अंत्यविधीत म्हटलं खुन का बदला खुन से लेंगे मग का 25 वर्षं आमदारकी भोगली. सत्ताभोगीपणा तुमच्या रक्तात आहे. म्हणुन तुम्हाला झोप येत नाही.
लोढा म्हणतात महानगरपालिकेत शिपाई च्या बदली चे तर रस्त्यावर उतरून जनतेला बरोबर घेऊन उपोषण का करत नाही. रक्तातील साखर वाढेल म्हणुन पहिल्या दिवशी उपोषण बंद करता. मग शिपायाला न्याय कसा मिळेल.
राहीले सिताराम सारडा येथील कॅन्टीनचे तेथील इतर गुंड लोकांचे अतिक्रमण काढा मग तुमची पाठ थोपटु तिथं झुकते माप का देता अशा विविध प्रश्नांवर शिव राष्ट्र सेने कडे उत्तरे आहेत.पण आपण ज्येष्ठ आहात शहरात आपल्या मुळेच विविध रंगाचे गुलाल उधळले आहेत हे विसरून चालणार नाही.