राजकारणराष्ट्रवादीत अल्पसंख्यांक समाजाला समान संधी देवून त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे कार्य सुरु -आ....

राष्ट्रवादीत अल्पसंख्यांक समाजाला समान संधी देवून त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे कार्य सुरु -आ. संग्राम जगताप राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाची नवीन कार्यकारिणी जाहीर

spot_img

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी पक्षात अल्पसंख्यांक समाजाला समान संधी देवून त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे कार्य सुरु आहे. युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांक समाज पक्षाशी जोडला आहे. राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांचे माणुसकी व सामाजिक भावनेने कार्य सुरु असून, त्यांच्या पाठपुराव्याने अल्पसंख्यांक बहुल नागरी क्षेत्र विकासासाठी 5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, सामाजिक न्याय विभागचे सुरेश बनसोडे, राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अमित खामकर, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, राष्ट्रवादी युवकचे सागर गुंजाळ, सुमित कुलकर्णी आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे आमदार जगताप म्हणाले की, सर्वसामान्य वर्गासाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणून साहेबान जहागीरदार यांचे कार्य सुरु आहे. अल्पसंख्यांक समाजात संघटन उभे करून दिशा देण्याचे काम ते करत आहे. माणुसकीच्या दृष्टिकोनाने त्यांचे कार्य सुरू आहे. कोरोना काळात देखील ऑक्सिजनचे टँकर बंद पडले असताना, अर्ध्या रात्री धावून जावून त्यांनी तो टँकर जिल्हा रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. सर्वसामान्यांच्या प्रश्‍नासाठी कार्य करणारे व अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्‍न सोडविण्याचे काम राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर नवीन पदाधिकाऱ्यांना सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

नवीन कार्यकारिणीची घोषणा राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी केली. आमदार जगताप यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. अल्पसंख्यांक समाजातील विविध प्रश्‍न शासनस्तरावर सोडविण्यासाठी व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना त्यांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या माध्यमातून कार्य करण्याचे नूतन पदाधिकाऱ्यांनी संकल्प केला.

साहेबान जहागीरदार म्हणाले की, समाजात सक्रीयपणे कार्य करणाऱ्या युवकांना पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी देण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील युवकांना जोडून समाजातील प्रश्‍न सोडविण्याचे काम केले जाणार आहे. अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याचे काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून झाले आहे. नुकताच मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून विकासाला चालना देण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप यांनी विकास कामाची लाट शहरात निर्माण केल्याने सर्व वर्ग त्यांना जोडला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:- शहर महासचिव- अब्दुल रऊफ खोकर, शहर सचिव- शाहनवाज शेख, शहर सरचिटणीस- वसीम शेख, शहर चिटणीस- जिशान खान, आबिद शेख, शहर संघटक रेहान- मोहम्मद कुरेशी, शहर जिल्हा उपाध्यक्ष- ताज खान, शहाबाज शेख, शहर उपाध्यक्ष- फरिद सय्यद, फिरोज पठाण, महारुफ सय्यद, मिजान कुरेशी, सद्दाम तांबोळी, सैफ शेख, रेहान खान, अमान तांबोळी, राकीब शेख, हंजला खान, शहबाज शेख, फैजान शेख, शाहरुख शेख, सोहेल शेख, साहिल शेख, अकिब बागवान, भिंगार शहराध्यक्ष- अकिल शेख, भिंगार शहर कार्याध्यक्ष- सलमान शेख, भिंगार शहर उपाध्यक्ष- अकिब शेख, कार्यकारणी सदस्य- सचिन शेलार, इसहाक शेख, योगेश वाघमारे, किशोर पवार, अरबाज सय्यद, चेतन पवार, रुपेश बनसोडे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...