राज्यभरामध्ये फिरणाऱ्या एसटी बसेस या लवकरच होणार इलेक्ट्रॉनिक व्हेइकल (EV)…
आमदार अमित गोरखे यांनी विधिमंडळात उपस्थित केलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे उत्तर
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार अमित गोरखे यांनी तारंकित प्रश्न उपस्थित करत राज्यातल्या बसेस या इलेक्ट्रॉनिक व्हेइकल (EV) कधी होणार या प्रश्नाला उत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले 5000 हजार इलेक्ट्रॉनिक व्हेइकल (EV) बसेस एसटी महामंडळाकरिता घेण्यात येणार असून त्याच्या व्यतिरिक्त L&G संदर्भातला करार हा आपण कतारच्या कंपनीसोबत पुढच्या दहा वर्षाकरिता केलेला असून एसटी महामंडळाच्या ज्या एक्झिटिंग बसेस आहेत त्या इलेक्ट्रॉनिक व्हेइकल (EV)
वरती टप्प्याटप्प्याने कन्व्हर्ट करणार आहोत.
पुढच्या काही काळात एसटी महामंडळाच्या बसेस नॉन कन्व्हेस्शनल फ्युओल वर करण्यात येणार असल्याची माहिती सभागृहाला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली.