ब्रेकिंग"रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल -...

“रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल – आमदार अमित गोरखे”

spot_img

“रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल – आमदार अमित गोरखे”

भारतीय उद्योगजगताचे ज्येष्ठ कर्मी आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष श्री. रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केले आहे. भाजपाचे प्रवक्ता म्हणून ते बोलत होते.

रतन टाटा यांचे भारतीय उद्योग, शिक्षण आणि सामाजिक सेवांमध्ये दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. टाटा समूहाच्या माध्यमातून देशाच्या विकासात मोठा वाटा उचलणाऱ्या रतन टाटा यांच्या कार्याला सन्मान देण्यासाठी भारतरत्न देणे उचित ठरेल, असे गोरखे यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, रतन टाटा यांच्या उद्योगधंद्यातील यशाबरोबरच त्यांच्या सामाजिक कार्यामुळेही ते सर्वांसाठी प्रेरणास्थान राहिले आहेत. त्यांचे शांत, संयमी आणि दूरदृष्टीने चाललेले कार्य सदैव देशासाठी मोलाचे राहील.

रतन टाटासारखी काही माणसं जगायला हवी, अमर असायला हवी! त्याशिवाय माणुसकीवरचा विश्वास कायम होत नाही. चांगली माणसही यशस्वी होतात याचे मूर्तिमंत उदाहरण….. अनेकांना श्रीमंत झाल्यानंतरही कसं असायला हवे हे सांगणारे रतन टाटा आज या जगातून गेले, पण त्यांचे विचार, आयुष्याची फिलॉसॉफी कायम रहावी, अजरामर व्हावी ही मनःपूर्वक इच्छा!

भावपूर्ण श्रद्धांजली सर…💐

भेटीची इच्छा अपूर्ण राहिली
😐 – डॉ.माधव कणकवले. सिव्हील सर्जन. 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माळशिरस नगरपंचायत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..!

माळशिरस नगरपंचायत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..! माळशिरस: - माळशिरस नगरपंचायतीचे कर निर्धारण अधिकारी विकास गोरख पवार...

IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल

IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल नवटाकेंविरोधात फसवणूक...

दौलत (नाना ) शितोळे ना राज्यमंत्री दर्जा तर भाऊसाहेब शिंदे ना विधान परिषद मिळणारं

दौलत (नाना ) शितोळे ना राज्यमंत्री दर्जा तर भाऊसाहेब शिंदे ना विधान परिषद मिळणारं मुंबई...

उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुध्द कारवाईसाठी पोलीस पथक नेमावं: वडारवाडी ग्रामपंचायतीची मागणी…!

उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुध्द कारवाईसाठी पोलीस पथक नेमावं: वडारवाडी ग्रामपंचायतीची मागणी...! अहिल्यानगरजवळ असलेल्या भिंगारलगतच्या वडारवाडी ग्रामपंचायत...