उद्योग विश्वया मराठी तरुणाने फक्त एका कारपासून सुरू केली कॅब कंपनी.. आता त्यांच्याजवळ...

या मराठी तरुणाने फक्त एका कारपासून सुरू केली कॅब कंपनी.. आता त्यांच्याजवळ ५०० कार आणि कंपनीचा टर्न ओव्हर आहे २५कोटी..!

spot_img

मूळचे सांगली येथील दिघंची आटपाडी गावातील असलेले विक्रम भोसले यांनी पुण्यात ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण पूर्ण केले.

त्यानंतर टाटा मोटर्स, बजाज ऑटो या प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये ऑटोमोबाईल इंजिनियर म्हणून 2011 ते 2016 पर्यंत नोकरी केली. नोकरी करत असतानाच स्वतःची पर्सनल कार असावी या दृष्टीने त्यांनी कार विकत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

कार विकत घेण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या लोनचा ईएमआयमुळे, आणि कारमधुन इन्कम जनरेट करण्यासाठी विक्रम यांनी त्यांच्या मित्राच्या सल्ल्यानुसार टुरिस्ट गाडी घेतली. त्यातून ते शनिवार-रविवार भाडे घेऊन स्वतः गाडी चालवू लागले.

इतर दिवशी ड्रायव्हर ठेवून गाडी भाड्याने दिली जात होती. यातून मिळणारी इन्कम व या बिझनेस मधील स्कोप विक्रम यांच्या लक्षात आला. त्यामुळे त्यांनी अजून एक टुरिस्ट कार विकत घेतली. त्यानंतर अशा आणखी दोन-तीन कार वाढवून ओला उबर सारख्या कंपन्यांची वेंडरशिप घेतली.

2016 मध्ये पूर्णवेळ टुरिस्ट कारचा बिझनेस करण्यासाठी विक्रम यांनी नोकरी सोडली. पुण्यामध्ये VRB technologies Pvt. Ltd ही कंपनी सुरू केली.

बिझनेस एक्सपांड करत त्यांनी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये प्रवेश केला. Amdocs , Eaton , Ecolab , Expleo , Wipro यांसारख्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना एम्पलॉइजची ने-आण करण्यासाठी कारची आवश्यकता असते. विक्रम यांनी अशा कॉर्पोरेट कंपन्यांना आपली कॅब सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यास सुरुवात केली.

VRB कंपनीच्या पुणे, मुंबई, बंगळूरु, हैदराबाद, दिल्ली येथील शहरांमध्ये एम्प्लॉयी ट्रान्सपोर्टेशन करणाऱ्या 500 पेक्षा अधिक कॅब आहेत. त्यातील कंपनीच्या स्वतःच्या 50 कॅब आहेत. मागील वर्षी VRB कंपनीचा टर्नओव्हर 22 कोटी होता. यावर्षीचा टर्नओव्हर 25 कोटी असण्याचा अंदाज आहे. फक्त 1 कॅबपासून सुरू झालेल्या VRB कॅब कंपनीची नेटवर्थ आज 60 कोटी रुपये आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

तटकरे यांचे पालकमंत्री पदाची स्थगिती हटविण्यासाठी शहरात राष्ट्रवादी युवतीची निदर्शने… महिलेला टार्गेट करणाऱ्या विकृतींचा निषेध! महिलांच्या सन्मानासाठी तटकरे यांना पुन्हा पालकमंत्रीपद मिळणे...

तटकरे यांचे पालकमंत्री पदाची स्थगिती हटविण्यासाठी शहरात राष्ट्रवादी युवतीची निदर्शने... महिलेला टार्गेट करणाऱ्या विकृतींचा निषेध! महिलांच्या...

दोषीवर कारवाई केली जाईल शिक्षण आयुक्तांनी दिले आश्वासन… शिक्षक भारती संघटनेचे शिक्षण आयुक्त कार्यालय समोर असंतोष धरणे आंदोलन यशस्वी

दोषीवर कारवाई केली जाईल शिक्षण आयुक्तांनी दिले आश्वासन... शिक्षक भारती संघटनेचे शिक्षण आयुक्त कार्यालय...

कारागृहातील १७५ कैद्यांची महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी… राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवसीय प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानअंतर्गत उपक्रम

कारागृहातील १७५ कैद्यांची महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी... राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवसीय प्रधानमंत्री...

भेंडा बुद्रुक येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

भेंडा बुद्रुक येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न अहिल्यानगर - महिलांनी विविध क्षेत्रात आपले कौशल्य...