गुन्हेगारी'या' पोलीस कर्मचाऱ्यानं पहा काय केलंय? वाचून तुमच्याही मनात येईल 'ही' भावना...!

‘या’ पोलीस कर्मचाऱ्यानं पहा काय केलंय? वाचून तुमच्याही मनात येईल ‘ही’ भावना…!

spot_img

पोलीस कर्मचारी म्हटलं, की सामान्य लोकांना कायद्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळणारा खाकी वर्दीतला कर्मचारी किंवा कामाच्या बदल्यात लाच घेणारा पोलीस दादा, असंच चित्र प्रत्येकवेळी डोळ्यासमोर आणायची काही गरज नाही. कारण महाराष्ट्र पोलीस दलात असे अनेक पोलीस कर्मचारी आहेत, की त्यांच्या कर्तव्याचा वरिष्ठांनादेखील सार्थ अभिमान वाटत असतो. अशीच अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या एका प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत.

नागपूरच्या शांतीनगर पोलीस ठाण्यात मिसिंगचा टेबल सांभाळणारे हेड कॉन्स्टेबल सुधीर खुबाळकर यांच्याविषयी लिहिताना आमच्यासुद्धा मनात त्यांच्याविषयी एक अभिमानाची भावना निर्माण झाली. हरवलेल्या व्यक्तींना शोधून आणण्याची जबाबदारी पोलीस हेडकॉन्स्टेबल खुबाळकर यांच्याकडे आहे. त्यांनी आतापर्यंत तब्बल 64 हरवलेल्या व्यक्तींना शोधून आणलं आहे. वाढत्या वयामुळे स्मृतीभ्रंश झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना घराचा पत्ता लवकर सापडत नाही. त्यामुळे ते हरवतात. अनेकजण रागात घर सोडून बाहेर निघून जातात. तर तरुण मुली इंस्टाग्राम आणि फेसबुकवर ओळख झालेल्या आणि त्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालेल्या तरुणाबरोबर पळून जातात. अशा सर्व लोकांना शोधून आणत त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करणं, हे काम मोठं जोखमीच असतं. मात्र 51 वर्षीय हेडकॉन्स्टेबल खुबाळकर ते काम सहजपणे करताहेत.

हेडकॉन्स्टेबल खुबाळकर हे सुट्टीच्या दिवशीसुद्धा काम करतात. एकदा पत्नीबरोबर ते टेकडी गणपतीच्या दर्शनाला गेले होते. तिथं उड्डाणपुलाखाली एक व्यक्ती बसलेली त्यांना दिसली. ती व्यक्ती मिसिंगमधली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी ताबडतोब पोलीस ठाण्यात फोन करुन टीम मागवून घेतली आणि त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास सांगितलं.

‘सद्रक्षणाय खलनिग्रणाय’ हे ब्रीदवाक्य खरं तर हेड कॉन्स्टेबल खुबाळकर यांच्या या कामगिरीतून सार्थ ठरत असल्याचं म्हटल्यास ती अतिशयोक्ति ठरणार नाही. महाराष्ट्र पोलीस दलात असे अनेक हेड कॉन्स्टेबल खुबाळकर आहेत. जनसेवेचे व्रत अतिशय प्रामाणिकपणे पाळणारे असे पोलीस कर्मचारी 24 तासांपैकी 17 ते 18 तास हे जे प्रामाणिकपणे काम करत आहेत, अशा सर्वच प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्यांना ‘महासत्ता भारत’ परिवाराचा मानाचा मुजरा.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...