भिंगार – यशवंत नगर गाव ते वडारवाडी गावाकडे जाणारा मुख्य रस्ता अंदाजे २ कीलो मिटर हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा या मागणीचे निवेदन अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने अ.नगर जि.प कार्यालय येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्याबरोबर चर्चा करून देण्यात आले.
या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनिभैय्या खरारे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन,जिल्हा कार्याध्यक्ष शुभम टाक,नगर शहराध्यक्ष रोहन चावरे,सामाजिक कार्यकर्ते तालेवार गोहेर, राष्ट्रवादी शहर सरचिटणीस आकाश ठाकुर, सामाजिक कार्यकर्ते विकास पंडित आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद अधिकारी व सा.बा.विभागाच्या गलथान कारभाराचा निषेध केला.
निवेदनात म्हटले आहे की यशवंत नगर गाव ते वडारवाडी गावाकडे जाणारा रस्ता येथून प्रवास करताना अक्षरशः नरकयातना भोगाव्या लागत आहेत.वारंवार हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी संबंधित विभागाला पत्र देऊनही अद्यापही या रस्त्याचे काम सुरू केले नसल्याने आज संघटनेच्या शिष्टमंडळाने आक्रमक पवित्रा घेत जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांना धारेवर धरले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्वरित या रस्त्याचे काम चालू करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
शहापूर केकति ग्रामपंचायतील यशवंत नगर गाव ते वडारवाडी गावाकडे जाणारा मुख्य रस्त्याची गेल्या काही काळापासून दुरवस्था झाली आहे.आणी परिसरातील रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे.रस्त्यावर अनेक मोठ मोठे खड्डे पडले आहेत जे खोल आणि मार्गक्रमण करणे कठीण आहे. त्यामुळे पादचारी आणि रस्त्याच्या वापर करणाऱ्या वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे.
परिस्थिती विशेषतः चिंताजनक आहे कारण शाळा आरोग्य केंद्र आणि इतर सुविधा सह अनेक समुदायांना जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्वरित कारवाई करावी. या रस्त्याच्या दुरवस्था मुळे गैरसोय होत तर आहेत शिवाय या भागातील नागरिकांच्या जीवही धोक्यात येत आहे.तरी ही बाब गांभीर्याने घेऊन सदर रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे.