लेटेस्ट न्यूज़मौजे- वडारवाडी गाव ते यशवंत नगर शहापूर-केकती गावाकडे जाणारा मुख्य रस्ता काँक्रिटीकरण...

मौजे- वडारवाडी गाव ते यशवंत नगर शहापूर-केकती गावाकडे जाणारा मुख्य रस्ता काँक्रिटीकरण करण्यात यावा

spot_img

मौजे- वडारवाडी गाव ते यशवंत नगर शहापूर-केकती गावाकडे जाणारा मुख्य रस्ता काँक्रिटीकरण करण्यात यावा

मौजे वडारवाडी गाव ते यशवंत नगर,शहापूर- केकती गावाकडे जाणारा मुख्य रस्त्याची फारच दुरावस्था झाली आहे.त्यामुळे पादचारी आणि रस्त्याच्या वापर करणाऱ्या वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे.परिस्थिती विशेषतः खूपच चिंताजनक आहे कारण शाळा आरोग्य केंद्र इतर सुविधा सह अनेक समुदायांना जोडणारा हा एक प्रमुख रस्ता आहे.हा रस्ता कच्चा असून पावसाळ्या मध्ये खुप मोठ्या प्रमाणात रस्त्यावर चिखल व तसेच रस्त्यावर खड्ड्यांमध्ये पाणी साचते या मुळे शाळेत विद्यार्थ्यांना व नागरिकांना जाता येताना अत्यंत अडचणीचा सामना करावा लागतो.या रस्त्यावर विद्युत खांब आहे पण एकाही खांबावर स्ट्रीट लाईट नाही.रात्रीच्या वेळी या रस्त्यावर लाईट नसल्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी भीती वाटते तरी वडारवाडी गाव ते शहापूर केकती गावाकडे जाणारा रस्ता लवकरात लवकर काँक्रिटीकरण करण्यात यावा व रस्त्यावर स्ट्रीट लाईट बसविण्यात यावे तसेच शहापूर – केकती गावातील विविध समस्या बाबत अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने नगर राहुरी मतदार संघातील आमदार श्री. शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या बरोबर चर्चा करून निवेदन देण्यात आले.या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन,जिल्हा उपसचिव आकाश ठाकुर,मानूर गावातील ग्रामपंचायत सदस्य संजू ढाकणे, सामाजिक कार्यकर्ते गोविंद घोडके,सुरेश नाईक,माजी सैनिक गणेश मोरे,सुभाष काळे,बाळासाहेब फासगे,भीवसेन अनाप,राजेंद्र गीरे,आदीसह नागरीक उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अनैतिक वापर झालेल्या, भंगार बसेसवरून ‘ शिवशाही ‘ हे नाव तातडीने हटवा..

अनैतिक वापर झालेल्या, भंगार बसेसवरून ' शिवशाही ' हे नाव तातडीने हटवा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील...

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने १.१० कोटींची फसवणूक; आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपींना सायबर पोलिसांची बेड्या

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने १.१० कोटींची फसवणूक; आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपींना सायबर पोलिसांची बेड्या अहिल्यानगर :...