शैक्षणिकमुख्यमंत्री सुंदर शाळा योजनेत स.तु.कदम विद्यालयाचा जिल्ह्यात डंका.. स.तू.कदम शाळा...

मुख्यमंत्री सुंदर शाळा योजनेत स.तु.कदम विद्यालयाचा जिल्ह्यात डंका.. स.तू.कदम शाळा पालघर तालुक्यात प्रथम, तर जिल्ह्यात दुसरी…! चार विद्यार्थ्यांवर सुरू झालेल्या शाळेत आता २२०० हून अधिक विद्यार्थी:

spot_img

पालघरः मुख्यमंत्री सुंदर शाळा योजनेत विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत स्वच्छतेची गोडी लागावी आणि हीच स्वच्छता त्यांच्या आयुष्याचा भाग बनावी असा उपक्रम राज्यात सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात पालघर जिल्ह्यातून तीन हजार शाळा सहभागी झाल्या होत्या. मुख्यमंत्री सुंदर शाळा उपक्रमात पालघर येथील स. तु, कदम विद्यालयाने जिल्ह्यात शाळेचा झेंडा उंचच ठेवला. ही शाळा पालघर तालुक्यातून प्रथम तर जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.

मुख्यमंत्री सुंदर शाळा उपक्रमात राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षक पालक विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांमध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी, म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे. गेल्या महिन्यात पंधरा तारखेपर्यंत हे अभियान राबविण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

शासनाच्या केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग आणि अन्य स्तरावर विशेष अभ्यास गट तयार करून त्यांच्यामार्फत विविध निकषानुसार शाळेचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यात आले होते. शासनाच्या सुंदर व आदर्श शाळा योजनेच्या निकषांची पूर्तता करत स. तु. कदम विद्यालयाने केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमाची दखल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान अभियानात घेण्यात आली.

विद्यार्थीउपयोगी विविध उपक्रम – या शाळेची स्थापना १९६८ मध्ये झाली असून संस्थेच्या एकूण नऊ आस्थापना आहेत. चार विद्यार्थ्यापासून सुरू झालेली शाळा आज २२०० हून देऊन अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. या शाळेत विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील असे विविध उपक्रम राबविले जात असून ५६ प्रकारच्या सुविधा त्यात दिल्या जात आहेत. या सुविधांमध्ये मुख्यतः ई क्लास, डिजिटल ग्रंथालय, डिजिटल विज्ञान,विभाग, विद्यार्थी संवाद, विद्यार्थी संसद, विद्यार्थी बचत बँक, स्काऊट गाईड, नेचर क्लब, शालेय परसबाग आदींची सोय आहे.

पाचवी ते बारावीला मानांकन- या शाळेत बालवाडीपासून कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत शिक्षणाची सुविधा असून, पाचवी ते बारावीच्या माध्यमिक विभागाला मानांकन मिळाला आहे. शाळेला मिळालेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वाघेश कदम, कोषाध्यक्ष प्रणव कदम, प्रभारी मुख्याध्यापक संगीता गायकवाड, प्रकल्प प्रमुख गणेश प्रधान तसेच शाळेतील पर्यवेक्षक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. त्यांच्या मेहनतीला यशाचे फळ आल्यामुळे पालकांनी व माजी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा…! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर बाणा आणि अभ्यासू आमदार अमित गोरखे यांचा तगडा पाठपुरावा…!

... अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा...! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर...

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...