लेटेस्ट न्यूज़मुकेश पाटलांचा ग्रामीण भागातील लोकांना मदतीचा हात... स्वतःच्या पायावर उभे करण्याचा यज्ञ!...

मुकेश पाटलांचा ग्रामीण भागातील लोकांना मदतीचा हात… स्वतःच्या पायावर उभे करण्याचा यज्ञ! दोन दशकांपासून शैक्षणिक, सामाजिक कामात मदत;

spot_img

पालघरः पालघर- (योगेश चांदेकर) देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे! घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, अशी कविता विंदा करंदीकर यांनी केली आहे; परंतु काही लोकांना घेण्याचे माहीतच नसते. ते सातत्याने देत जावे आणि दिल्याचे कुणाला कळू देऊ नये अशा मानसिकतेचे असतात. ‘सन ग्रुप’चे संस्थापक मुकेश प्रभाकर पाटील हे त्यापैकीच एक असून गेल्या दोन दशकांपासून अडीअडचणीतील लोकांच्या मदतीला धावून जात आहेत.

पाऊस आला, की अनेकांना तो जसा उपयुक्त ठरतो, तसाच तो अनेकांना रस्त्यावर आणतो. अशा वेळी सातत्याने मदतीला कोण येईल असा प्रश्न पडला, की मुकेश पाटील यांचे नाव पुढे येते. आयुष्य जगताना अनेक समस्या, संकटे येत असतात. जगण्याचे नेमके मार्ग अशावेळी सुचत नाहीत. डगमगते मन औदासिन्याकडे घेऊन जाते. अशा अवस्थेत मनाला उभारी द्यायला मुकेश पाटील हेच पुढे येत असतात.

लोकांच्या जीवनात ठोस बदलावर भर
अनेक वेळा संकटातील व्यक्तींना मदतीचा हात देऊन त्यांना संकटातून बाहेर काढण्याचे काम पाटील करतात. सामाजिक काम हे केवळ लोकांना मदतीचा हात देण्यापुरते मर्यादित नसते, तर लोकांच्या जीवनात ठोस बदल करण्यासाठी ते उपयुक्त असते. लोकांच्या दररोजच्या जगण्या, मरण्याच्या प्रश्नात अनेकांना मदतीची गरज भासते. मग, ती मदत आर्थिक असो वा अन्य स्वरूपात; अशावेळी पाटील हेच पुढे धावून येतात आणि लोकांना मदत करण्याचा यज्ञ त्यांनी सुरू ठेवला आहे

मानधनही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला
पाटील हे दोन वेळा पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यांनी आतापर्यंत दिव्यांग, अन्य विद्यार्थ्यांना तसेच अनेक गरजूंना शैक्षणिक साहित्य तसेच अन्य स्वरूपात मदत केली आहे. पालघर जिल्ह्या हा अती दुर्गम असून अशावेळी अडल्या, नडलेल्या रुग्णांना तातडीने उपचार मिळण्याची आवश्यकता असते. ही गरज ओळखून मुकेश पाटील यांनी रुग्णवाहिका घेण्यासाठी आर्थिक मदत केली. पंचायत समिती सदस्य असताना त्यांना मिळणाऱ्या मानधनाची रक्कम स्वतःसाठी न वापरता त्यांनी ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली.

थेट कोल्हापूरपर्यंत मदत
कोरोनाच्या काळात पाटील यांनी लोकांना केलेली मदत अनेकांच्या स्मरणात आहे. संकटे कुठेही आणि कोणतीही असली, त्यांना माहिती मिळाली, की जात, पात, प्रांत असा कुठलाही भेद न करता पाटील मदतीला धावून जातात. रायगड जिल्ह्यात आलेल्या महापुराच्या वेळी नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत तिथे जाऊन पोहोचवण्यात त्यांनी मोलाचे काम केले. त्याचबरोबर कोल्हापूरला पंचगंगा नदीला महापूर आला, त्या वेळी त्यांनी प्रत्येक घरात संसारोपयोगी साहित्य पोहोचवले होते. १२ टन समाजोपयोगी साहित्य बोईसरवरून कोल्हापूरला मुकेश पाटील यांच्या माध्यमातून मदत स्वरूपात गेले होते

ग्रामीण भागातील कलाकार, खेळाडूंना मदत
अनेक घडलेल्या अपघातातील मृताच्या कुटुंबीयांना त्यांनी मदतीचा हात दिला असून . बोईसर परिसरातील युवकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करण्यात पाटील आघाडीवर असतात. दहीहंडी, नवरात्रोत्सव,असो की अन्य स्थानिक उत्सव; कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम ते करत असतात. या परिसरात होणाऱ्या बहुतांश क्रीडा स्पर्धांच आयोजनही त्यांच्या माध्यमातून होत असते.

मुंगी साखरेचा रवा या वृत्तीने काम
गेल्या वीस वर्षांपासून मुकेश पाटील हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असून विद्यार्थ्यांना साहित्य, महिलांना शिवणयंत्र वाटप व याच माध्यमातून त्यांचे सक्षमीकरण अशा वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक योगदान सुरू आहे. सामाजिक क्षेत्रात वावरत असताना मदत केली तरी या हाताचे त्या हाताला कळू नये याबाबत ते दक्ष असतात. ‘हेचि दान देगा देवा मुंगी साखरेचा रवा’ ही संतांची शिकवण त्यांनी मदतीच्या बाबतीत आचरणात आणली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..! अहमदनगर : जामगाव, ता. पारनेर,...

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...