गुन्हेगारी'मी पत्रकार आहे, हॉटेल चालवायचं असेल तर दर महिन्याला दहा हजार रुपये...

‘मी पत्रकार आहे, हॉटेल चालवायचं असेल तर दर महिन्याला दहा हजार रुपये हप्ता दे’ ; नेवासे तालुक्यातला प्रकार ; एस. पी . ओला यांच्या आदेशानं तोतया पत्रकाराविरुध्द गुन्हा दाखल…!

spot_img

‘तुमच्या हॉटेलवर काय धंदे चालतात, ते मला माहित आहे. तुम्ही वेश्या व्यवसाय चालवता आहात, बाया नाचवता, त्यामुळे तुम्हाला जर तुमचे हॉटेल चालवायचं असेल तर तुम्ही मला महिन्याला दहा हजार रुपये द्यावे लागतील. अन्यथा मी पत्रकार असल्याने तुमची पेपरमध्ये बातमी छापून बदनामी करीन, तुमचे हॉटेल चालू देणार नाही, मी अर्ज फाटे करून चांगले चांगले लोक कामाला लावले आहेत, असे म्हणून फिर्यादीस भिती घालून खंडणी मागितल्याचा प्रकार नेवासे तालुक्यात घडलाय. नगर जिल्ह्याचे एस. पी. राकेश ओला यांच्या आदेशानं याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्निल ज्ञानदेव गरड (रा. सौंदाळा ता. नेवासा जिल्हा अहमदनगर) असं त्या पत्रकाराचं नाव असून काल (दि. २०) नेवासा पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. वास्तविक पाहता स्वप्निल गरड हा कुठल्याही दैनिकाचा किंवा मिडियाचा पत्रकार नाही, ही विशेष बाब आहे.

या प्रकरणी कुदबुद्दीन हसूलाल शेख (रा. देवगाव, ता. नेवासा) यांनी पोलीस ठाणे नेवासा येथे फिर्याद दाखल केली होती. सदरच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय दंड विधान सहिता क. 385, 506 अन्वये गुन्हा दाखल केला.

स्वप्निल गरड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द यापूर्वी खंडणी मागणीचे दोन गुन्हे, शासकीय मालमत्ता विद्रूपीकरण कायद्याअंतर्गत एक गुन्हा, ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत अंतर्गत एक गुन्हा व चोरीचा एक गुन्हा असे एकूण ५ गुन्हे नोंद आहेत.

वारंवार कायदा हातात घेणाऱ्या व खंडणी मागणाऱ्या अशा खंडणीखोर लोकांवर कायद्याचा कठोर बडगा उगारला जाईल व त्यास कायद्याच्या कचाट्यात जखडलं जाईल, जेरबंद केलं जाईल असा सक्त इशारा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिला आहे.

ब्लॅकमेल करून नागरिकांना कोणी छळत असेल त्रास देत असेल तर अशा नागरिकांनी न भिता, न डगमगता निर्भीडपणे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना सरळ भेटावे व पोलिसात फिर्याद दाखल करावी म्हणजे कायद्याच्या माध्यमातून कसता येईल असे आवाहन करण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कल्लूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या सुचनेनुसार पोलीस ठाणे, नेवासा अधिकारी आणि अंमलदार यांनी केली. 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...