योगतज्ञ परमपूज्य दादाजी वैशंपायन यांच्या १०५ व्या जयंती उत्सवानिमित्त यावर्षीचा राज्यस्तरीय अध्यात्मिक पुरस्कार नारायण भाटे (पुणे) आणि मिलिंद चवंडके (अहिल्यादेवीनगर) यांना जाहिर करण्यात येत आहे. दरम्यान, डाॅ. धर्मवीर भारती (लातूर) यांची सामाजिक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून गुरुवार दि.२३ मे २०२४ रोजी दुपारी ४ वाजता शेवगांवमधील प.पू. दादाजी वैशंपायननगरमध्ये पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती गुरूदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे अध्यक्ष अर्जुन फडके आणि सचिव फुलचंद रोकडे यांनी दिली.