मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन…!
देशाला स्वातंत्र्य मिळवूनदेखील मातंग समाजबांधवांवर अन्याय सुरुच आहे. याबद्दल समाजात प्रचंड संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे. राहुरी तालुक्यातील कणगर या गावात शेतीच्या वादावरुन मातंग समाजातील पुरुषांसह महिलांनादेखील रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली. मात्र ज्यांनी ही मारहाण केली, ते आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत. या संदर्भात संतप्त मातंग समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत निवेदन दिलं.
यावेळी मातंग समाजातील विविध संघटनांचे दलित महासंघाचे प्रदेश अध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील, जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंदाकिनी मेंगाळ, जिल्हा संपर्कप्रमुख कडूबाबा लोंढे, चंद्रकांत सकट , विठ्ठल पाटोळे,बंडू पाडळे,किशोर वाघमारे,सुनील सकट, ना.म.साठे सर, विश्वनाथ आल्हाट सर,गुलाब गाडे,रंगनाथ अडागळे, त्याचप्रमाणे लहुजी शक्ती सेना जिल्हा महासचिव किरण भाऊ उमाप पिडीत कुटुंबातील सदस्य आदेश लाहुंडे, प्रफुल लाहुंडे, पंकज लाहूंडे, अजय लाहुंडे, गौरव लाहूंडे, सुनील भाऊ सकट, विशाल भाऊ उमाप, संदीप भाऊ औचीते, कृष्णा गाडेकर, अभिजीत सकट, घनश्याम गाडेकर, विनोद दिवटे, विशाल गाडे, अशोक भोसले, शुभम साठे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या शनिवारी (दि. ७) राहुरी तालुक्यातल्या कणगर गावातल्या लोकांनी मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण केली. मारहाण करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आंदोलनाद्वारे केली.