राजकारणमातंग समाजातील प्रमुख पदाधिकारी अरुण जोगदंड मंगेश डाखोरे व अण्णासाहेब कसबे यांच्या...

मातंग समाजातील प्रमुख पदाधिकारी अरुण जोगदंड मंगेश डाखोरे व अण्णासाहेब कसबे यांच्या आमरण उपोषणाला यश.- युवराज दाखले

spot_img

पिंपरी- प्रतिनिधी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या निगडी येथील पूर्णाकृती पुतळ्यास महा मेट्रोच्या कामकाजामुळे पडलेल्या क्रॅक्स व बीआरटी बस स्थानकास साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नाम फलकाची तोडफोड करून केलेले विडंबन याच्या निषेधार्थ मातंग समाजातील प्रमुख पदाधिकारी यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास दुग्ध अभिषेक करून सुरुवात करण्यात आली होती.

महा मेट्रो प्रशासनानं या उपोषणाची गंभीर अशी दखल घेऊन उपोषण करते यांना लेखी स्वरूपामध्ये पुन्हा अशा प्रकारची घटना घडणार नाही व घडलेल्या घटनेची माफी मागून दुरुस्ती करण्यासंदर्भात लेखी उत्तर दिल्याने प्रमुख पदाधिकारी यांचे चालू केलेलं आमरण उपोषण नारळ पाणी घेऊन स्थगित करण्यात आलं.
अमर उपोषणकर्ते यांच्या पुढील मागण्या लेखी मान्य करण्यात आल्या.
1) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा नामफलक एलईडी मध्ये येत्या पंधरा दिवसाच्या आत मध्ये लावणार.

2) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाची झालेली पडझड हे तात्काळ दुरुस्त करून देणार यापुढे अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकालगत कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही,अशी लेखी हमी देण्यात आली.

3)तसेच मेट्रो प्रशासन व पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन यांची एकत्र बैठक हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लावून सा लो अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास पुतळ्यासाठी 20 गुंठे जागेची मागणी प्रस्ताव तयार करून देण्यासाठी योग्य ते सहकार्य करणे.

अशा प्रकारच्या लेखी मागण्यांची मान्यता त्यांनी लेखी स्वरूपामध्ये देण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब आढागळे, ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे ,बहुजन विकास आघाडी संस्थापक अध्यक्ष संजय धुतडमल, माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर ,मारुती भापकर ,सा लो अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष संजय ससाणे,जेष्ठ नेते संदिपान झोंबाडे, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती मा.अध्यक्ष डी पी खंडाळे, रामदास कांबळे,राजु चव्हाण, शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे , पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले ,शिवशाही व्यापारी संघ पि चि शहर उपाध्यक्ष अविनाश गायकवाड,महासचिव सुरज कांबळे,शिवशाही व्यापारी संघ महीला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा सीमाताई भालेराव,मारूती जाधव,शिवशाही वाहतुक आघाडी शहर अध्यक्ष अनिल तांबे,शिवाजीराव साळवे अनिल तांबे, अविनाश कांबीकर,अमोल लोंढे, लक्ष्मण वैरागे, विक्रम गायकवाड, लहुजी शक्ती सेना युवक अध्यक्ष अक्षय पौळ.

क्रांतिवीर विचार मंचाचे पदाधिकारी अविनाश शिंदे,बाबासाहेब पाटोळे,राजु आवळे,शंकर खवळे,लहू अडसूळ,धीरज सकट,अविनाश गायकवाड,सागर कापसे,बाप्पू झाडे,गणेश तुपे,बाळू कुचेकर,अंकुश फुलवले,राजु वानखेडे,सोमनाथ कांबळे, आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

तटकरे यांचे पालकमंत्री पदाची स्थगिती हटविण्यासाठी शहरात राष्ट्रवादी युवतीची निदर्शने… महिलेला टार्गेट करणाऱ्या विकृतींचा निषेध! महिलांच्या सन्मानासाठी तटकरे यांना पुन्हा पालकमंत्रीपद मिळणे...

तटकरे यांचे पालकमंत्री पदाची स्थगिती हटविण्यासाठी शहरात राष्ट्रवादी युवतीची निदर्शने... महिलेला टार्गेट करणाऱ्या विकृतींचा निषेध! महिलांच्या...

दोषीवर कारवाई केली जाईल शिक्षण आयुक्तांनी दिले आश्वासन… शिक्षक भारती संघटनेचे शिक्षण आयुक्त कार्यालय समोर असंतोष धरणे आंदोलन यशस्वी

दोषीवर कारवाई केली जाईल शिक्षण आयुक्तांनी दिले आश्वासन... शिक्षक भारती संघटनेचे शिक्षण आयुक्त कार्यालय...

कारागृहातील १७५ कैद्यांची महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी… राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवसीय प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानअंतर्गत उपक्रम

कारागृहातील १७५ कैद्यांची महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी... राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवसीय प्रधानमंत्री...

भेंडा बुद्रुक येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

भेंडा बुद्रुक येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न अहिल्यानगर - महिलांनी विविध क्षेत्रात आपले कौशल्य...