राजकारणमाजी आमदार आनंदभाई ठाकूर यांचे जनसेवेला प्राधान्य़.. वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन, शुभेच्छांचा...

माजी आमदार आनंदभाई ठाकूर यांचे जनसेवेला प्राधान्य़.. वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन, शुभेच्छांचा वर्षाव; बांबू लागवडीतून महाराष्ट्राला वेगळी दिशा!

spot_img

पालघरः माजी आमदार आनंदभाई ठाकूर यांनी कोकणात सर्वप्रथम व्यावसायिक पद्धतीने बांबू लागवड करून शेतकऱ्यांना व्यावसायिक शेतीचा आदर्श घालून दिला.आनंदभाई ठाकूर हे प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांनी बांबू लागवडीचा अभ्यास केला. कोकणात चांगल्या पद्धतीने बांबू येऊ शकतो. हे त्यांनी पाहिले आणि बांबूच्या वेगवेगळ्या जाती आणून त्याची डहाणू तालुक्यात लागवड केली. आता त्यांच्या बांबूची लागवड पाहण्यासाठी दूरवरून शेतकरी येतात; परंतु आनंदभाई यांनी मात्र अगोदर ही शेती फायद्याची कशी होईल हे स्वतः अनुभवातून इतरांना दाखवून दिले आणि मग बांबूच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले.

माणसं जपणारा नेता
आनंदभाई यांच्यावर शरद पवार यांचा पगडा होता. शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेत काम करण्याची संधी दिली. आता मात्र आनंदभाई यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे. याशिवाय पालघर लोकसभा मतदारसंघाचे मित्रपक्षाचे समन्वयक म्हणूनही ते काम करतात. त्यांचे घर हे कायम माणसांचे मोहोळ असते. रंजल्या गांजलेल्यांचे प्रश्न त्यांनी विधान परिषदेत मांडले

शेतकर्यांना न्याय देण्याचे काम
दीनदुबळ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा असे ते म्हणतात. डोंगरदऱ्यात कष्ट करणाऱ्या कलाकारांचे काम आवडले, की त्यांना उत्स्फूर्त दाद देण्याचे ते काम करत असत 1983 मध्ये युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. डहाणू तालुक्याचे पहिले सभापती बनण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. डहाणू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले.

डाव्यांच्या बालेकिल्ल्यात पक्षाचा विस्तार
शरद पवार यांच्या अष्टपैलू, अभ्यासू, मुत्सद्दी व्यक्तिमत्वाने त्यांना प्रभावित केले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आतापर्यंत आनंदभाई पवार यांच्यासोबत राहिले. डहाणू, तलासरी विक्रमगड हे तालुके मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बालेकिल्ले असताना आनंदभाईंनी मात्र आपल्या श्रमातून आणि संघटना चातुर्यातून राष्ट्रवादी काँग्रेस वाड्या-पाड्यापर्यंत पोहोचवला. ठाणे ग्रामीणमध्ये आणि आत्ताच्या पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व वाढवण्याचे आणि पक्षाला बहुमान मिळवून देण्याचे काम आनंदभाईंनी केले.

कार्यकर्त्यांचा वाढविला सन्मान
स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ठाणे जिल्हा मजूर महासंघ, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक, शासकीय महामंडळे आदी ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सन्मानाने वागणूक मिळेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्या पदावर जातील, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, उपमुख्यमंत्री अजित पवार. आर. आर. पाटील, छगन भुजबळ यांच्याशी त्यांचे ऋणानुबंधाचे संबंध राहिले.

गावापासून देशपातळीपर्यंत कामाचा ठसा
कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अशी विविध पदे त्यांना मिळाली. ठाणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते डहाणूमधून निवडून गेले होते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना त्यांनी अनेक विधायक कामे केली. कोकण पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष असताना त्यांनी सूर्या खोऱ्याचे पाणी पश्चिमेला वळवण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला. त्यांनी शिक्षण संस्थाचा प्रसार केला. आश्रम शाळा वसतिगृह, औद्योगिक संस्था उभारून लोकसेवेचा वसा अंगीकारला. भारतीय कृषी अनुसंधान परिषद, विधान परिषद सदस्य, आयसीएआर आदी महत्त्वाच्या संस्थांवर त्यांनी काम केले. त्यांच्या या कामाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी उजाळा दिला आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..! अहमदनगर : जामगाव, ता. पारनेर,...

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...