गुन्हेगारीमहिलेचा विनयभंग आणि तिच्या पतीला मारहाण करणाऱ्या आरोपींना नेवासे कोर्टानं ठोठावली एक...

महिलेचा विनयभंग आणि तिच्या पतीला मारहाण करणाऱ्या आरोपींना नेवासे कोर्टानं ठोठावली एक वर्ष कारावास आणि दंडाची शिक्षा…!

spot_img

घरात सारवण काम करत असलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तिचा पती जाब विचारण्यासाठी गेला असता आरोपीसह चौघांनी त्याला शिवीगाळ करत लोखंडी पाईपनं मारहाण करून जखमी केलं. तसंच जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोपी किरण गायकवाड हा मोबाईल चार्जिंग लावण्याच्या बहाण्यानं सदर महिलेच्या घरात घुसला होता. दि. 17 जून 2012 रोजी घडलेल्या या घटने प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी नेवासा कोर्टात चौघा आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र सादर केलं.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. गुंजवटे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत आरोपी किरण भानुदास गायकवाड, भानुदास रामभाऊ गायकवाड, मिराबाई भानुदास गायकवाड आणि सुवर्णा किरण गायकवाड या चौघांना एक वर्ष कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली.

या खटल्यात अभियोग पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीमती एस. पी. औताडे यांनी काम पाहिलं. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू शंकर काळे आणि ज्योती नवगिरे यांनी सहाय्य केले. नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...