नेवासे तालुक्यातल्या सोनईजवळ असलेल्या धनगरवाडी परिसरात 80 फूट पाणी असलेल्या एका विहिरीत जाधव आडनावाच्या इसमानं (संपूर्ण नाव समजलेलं नाही) आज (दि. 19) दुपारी दोन तासांपूर्वी उडी घेतली. याबाबत सोनई पोलिसांना माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल राख घटनास्थळी हजर झाले.
या विहिरीत 80 फूट पाणी असल्यानं संबंधित जाधव आडनावाच्या इसमाला विहिरीच्या बाहेर काढणं प्रचंड कठीण झालं आहे. आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या मदतीनं संबंधित इसमाला बाहेर काढण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरु केले असून यामध्ये बऱ्याच अडचणी येत आहेत.
दरम्यान, विहिरीतल्या या संपूर्ण पाण्याचा उपसा झाल्याशिवाय संबंधित इसमाला विहिरीच्या बाहेर काढणं अशक्य आहे. मात्र सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. जाधव आडनावाच्या या इसमानं विहिरीत उडी का मारली, त्याचं संपूर्ण नाव काय आहे, तो कुठला राहणारा आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासानंतरच मिळणार आहेत. मात्र या घटनेमुळे लोहगाव परिसरात उलट सुलट चर्चेला उधाण आलं आहे.