लेटेस्ट न्यूज़महासत्ता भारत' बिग ब्रेकिंग न्यूज...! इमामपूर घाटात भीषण अपघात ; एक...

महासत्ता भारत’ बिग ब्रेकिंग न्यूज…! इमामपूर घाटात भीषण अपघात ; एक जण ठार …!

spot_img

अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातल्या नगर तालुक्यात असलेल्या इमामपूर घाटात आज (दि. १८) सकाळी साडे दहाच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात नेवासे तालुक्यातल्या खरवंडी इथले अनिल दगडू फाटके हे ठार झाले असून त्यांची मुलगी जखमी झाली आहे.

डांबराची पिंपे छत्रपती संभाजीनगरकडे घेऊन जाणाऱ्या कंटेनरने फाटके यांच्या दुचाकीला  धडक दिली आणि हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या अपघातात मयत झालेले अनिल दगडू फाटके हे त्यांच्या मुलीच्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेसाठी नगरकडे जात होते. त्याचवेळी काळानं त्यांच्यावर घाला घातला.

या अपघातात फाटके यांची मुलगी जखमी झाली आहे. अपघाताची माहिती समजताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अपघातस्थळी पोहोचले. तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण करुन जखमी मुलीला आणि तिच्या वडिलांना उपचारार्थ दवाखान्यात नेण्यात आलं. या अपघाता दरम्यान इमामपूर घाटात वाहनांची मोठी गर्दी झाली होती. मात्र पोलिसांनी काही वेळातच वाहतूक सुरळीत केली. या अपघाताने नेवासा तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे!

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त...