एकेकाळचे ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ प्रदीप शर्मा यांच्या निर्दोष मुक्ततेचा आदेश हायकोर्टाने रद्द करत शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नोव्हेंबर 2006 मध्ये बनावट लाखन भैया चकमक झाली होती. त्या चकमकीत बारा आरोपींना ट्रायल कोर्टानं ठोठावलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली.
ट्रायल कोर्टानं 13 आरोपींना दोशी ठरवत एकेकाचे एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली होती. परंतू, हायकोर्टानं प्रदीप शर्माची निर्दोष मुक्तता हा आदेश रद्द केला आणि पुराव्याची जी मालिका आहे. त्या आधारे शर्मा याला दोषी ठरवलं. अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातदेखील प्रदीप शर्मा आरोपी आहे.