राजकारणमहाविकास आघाडीतील पक्षश्रेष्ठींमध्ये नगर शहरातील जागेबाबत वेगवान हालचाली..!

महाविकास आघाडीतील पक्षश्रेष्ठींमध्ये नगर शहरातील जागेबाबत वेगवान हालचाली..!

spot_img

महाविकास आघाडीतील पक्षश्रेष्ठींमध्ये नगर शहरातील जागेबाबत वेगवान हालचाली..!

अहिल्यानगर – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून मातोश्रीवर सध्या वेगवान हालचाली सुरु आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात दोन जागा उध्दव ठाकरेंच्या शिवसेना मशालीकडे देण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक नगर – नेवासा तर दुसरी नगर शहराला देण्यात आली होती.

महासत्ता भारत पेज ला Subscribe करा

परंतु नगर शहराची उबाठा शिवसेना गटाची जागा बदलून ती जागा श्रीगोंदा मतदार संघाला जाणार असल्याची माहिती मिळत असून त्या अनुषंगाने श्रीगोंदा मतदार संघातील दावेदार साजन पाचपुते यांचे नाव मागे पडले असून या मतदार संघातून अनुराधा नागवडे यांना मशाल चिन्हाची उबाठा शिवसेना गटाकडून उमेदवारी देण्यात येणार असून उद्या रविवारी दि.२० रोजी अनुराधा नागवडे या कदाचित मातोश्री वर जाऊन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक माहिती मिळत आहे.

दरम्यान नगर शहराची जागा शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात येत असून या पक्षाकडून तुतारी चिन्हावर दिलीप सातपुते व अभिषेक कळमकर हे प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र या संपूर्ण हालचालींमध्ये खासदार निलेश लंके यांची भूमिकाही महत्वाची मानली जात आहे.

त्याचप्रमाणे स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघ उबाठा शिवसेनेला देण्यात आला असून मशाल या चिन्हावर या मतदारसंघाचे विद्यमान आमदार शंकरराव गडाख हे निवडणूक लढणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...

दारूची बाटली व पाच हजार रुपये रोख लाच घेतल्याबद्दल तीन पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ने केला गुन्हा दाखल..!

दारूची बाटली व पाच हजार रुपये रोख लाच घेतल्याबद्दल तीन पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने...

गॅस कंपनीच्या ठेकेदाराकडे तब्बल १० लाखांच्या खंडणीची मागणी.. एमआयडीसी पो.स्टे.ला गुन्हा दाखल..!

गॅस कंपनीच्या ठेकेदाराकडे तब्बल १० लाखांच्या खंडणीची मागणी.. एमआयडीसी पो.स्टे.ला गुन्हा दाखल अहिल्यानगर (दि.२४ प्रतिनिधी):-एमआयडीसीत...