राजकारणमहायुती आणि महाआघाडीचेही जागावाटप ठरेना: पालघर लोकसभा मतदारसंघाबाबत पेच कायम...

महायुती आणि महाआघाडीचेही जागावाटप ठरेना: पालघर लोकसभा मतदारसंघाबाबत पेच कायम जागा वाटपानंतरच उमेदवारीचा प्रश्न निकाली निघणार

spot_img

पालघरः (योगेश चांदेकर)- पालघर लोकसभा मतदारसंघात बदललेल्या राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडी आणि महायुतीला ही जागा कोणाला हे अद्याप ठरवता आलेले नाही. त्यामुळे उमेदवार निश्चितीच्या पातळीवरही अजून शांतताच आहे.सोळा वर्षांपूर्वी पालघर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीची ताकद असली, तरी गेल्या काही निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकापुढे त्यांना जाता आलेले नाही. पोटनिवडणुकीचाच काय तो अपवाद. डावे आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात आता मात्र उजव्यांची चलती आहे.

ठाकरे गटाचा एकही आमदार नाही
महायुतीत सध्या तरी हा मतदार संघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात आहे; परंतु या मतदारसंघावर भाजपने दावा केला असून मतदारसंघ कोणाच्या वाट्याला हे अद्याप महायुतीला ठरवता आले नाही. तीच गत महाविकास आघाडीची आहे. महाविकास आघाडीपूर्वी शिवसेनेचा खासदार येथे होता; परंतु उद्धव ठाकरे गटाकडून राजेंद्र गावित शिंदे गटाकडे गेले आहेत. गावित शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाला वर्चस्व निर्माण करता आले नाही. सहा लोकसभा मतदारसंघांपैकी एकाही विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचा आमदार नाही.

पर्यायी उमेदवाराचा शोध संपेना
गावित शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेनेचा या मतदारसंघातील पर्यायी उमेदवार कोण असेल यावर ठाकरे गटाने अद्यापही निर्णय घेतला नाही. मतदारसंघाच्या आणि संघटनात्मक बांधणीवरील पुरेसे लक्ष दिलेले नाही. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाण्याची शक्यता असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला हा मतदारसंघ सोडण्याबाबतही चर्चा होत असते. १९८९ पासून भाजपने या मतदारसंघात वारंवार निवडणूक लढवून आपली पाळेमुळे मजबूत केली आहेत. या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातून भलेही भाजपचा एकही आमदार नसेल, तरी लोकसभेला मात्र हा मतदारसंघ भाजपला अनुकूल ठरतो.

डाव्यांकडून उजव्यांकडे
पूर्वी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि नंतर काँग्रेस अशा पक्षांचे वर्चस्व असलेल्या हा मतदारसंघ आता शिवसेना-भाजप या पक्षांच्या वर्चस्वाखाली आला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने गावित हेच धनुष्यबाणावर निवडणूक लढवतील, अशी घोषणा करून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असला तरी भाजपने मात्र अजूनही आशा सोडलेली नाही. वेगवेगळ्या सर्वेक्षणाचे आधार घेऊन मतदार संघ आपल्याकडे आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मतदारसंघ मिळत नसेल तर उमेदवार तरी किमान बदलावा यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.

उमेदवाराचे नाव आणि चिन्ह पोचवण्याचे आव्हान
या मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर गावित निवडून आले होते. त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याला सोडावा असा आग्रह महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाने धरला आहे. अनेक उमेदवारांची नावे या मतदारसंघातून पुढे येत असली, तरी अद्याप तिथला उमेदवार निश्चित नाही आणि पक्षाचे नवे चिन्ह तसेच उमेदवार सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ठाकरे गटाने फार प्रयत्न केले असे दिसत नाही. ऐनवेळी उमेदवारी जाहीर केल्यानंतर उमेदवाराचे नाव आणि पक्षाचे नवे चिन्ह पोहोचवण्याचे मोठे आव्हान ठाकरे गटासमोर आहे.

शरद पवार गटाला जागा दिली, तरीही तेच आव्हान
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाला उमेदवारी देऊन इतर घटक पक्षांच्या मदतीने ही निवडणूक लढवावी आणि बहुजन विकास आघाडीशी तडजोड करावी असा एक मतप्रवाह येथे आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात अनेक पक्षांतरे आणि कार्यकर्त्यांची पळवापळवी सुरू आहे. शरद पवार गटाला हा मतदारसंघ सोडला, तरी त्यांच्या गटाच्या उमेदवाराचे नाव आणि पक्षचिन्ह पोचवण्याचे त्यांच्यापुढेही मोठे आव्हान आहे. नवीन पक्षचिन्ह दुर्गम भागातील लोकांपर्यंत कसे पोचवणार हा प्रश्नच आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...