अँन्टी करप्शनमहापालिकेतील अधिकाऱ्याला 75 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत विभागाकडून अटक

महापालिकेतील अधिकाऱ्याला 75 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत विभागाकडून अटक

spot_img

मुंबई – : मुंबई महानगर पालिकेच्या के इस्ट वार्ड मधील पद निर्देशित अधिकाऱ्याला 75 लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. मंदार तारी असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, महापालिकेतील अधिकारी लाच घेताना सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अधिकची माहिती अशी की, अंधेरीतील एका प्लॉटचे बांधकाम न तोडण्यासाठी अधिकाऱ्याकडे तक्रारदाराकडे 2 कोटीची मागणी केली होती. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने 7 ऑगस्ट 2024 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर तारी यांनी एका खासगी व्यक्तीस लाचेचा पहिला हप्ता म्हणून 75 लाख स्वीकारण्यास सांगून तेथून पळ काढल्याची महिती पोलिसांनी दिली. याच लाचेचा गैरलाभ मिळवण्यासाठी तारी यांनी प्रयत्न केल्यानंतर लाच लुचपत विभागाच्या पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. खासगी व्यक्तीकडून तारी यांनी 75 लाखाची रक्कम स्वीकारली होती. त्यावेळी 2 खासगी व्यक्तींना पोलिसांनी अटक केली होती. तेव्हा पासून तारी हे फरार होते.

दरम्यान अटकपूर्व जामीनासाठी तारी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने तारी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर तारी हे आज पोलिसांसमक्ष हजर झाले. या प्रकरणात तारी यांना लाच लुचपत प्रकरणात अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

मुंबई महानगर पालिकेच्या के इस्ट वार्ड मधील पद निर्देशित अधिकार्याला 75 लाखाची लाच स्विकारल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे

मंदार तारी असे लाच घेणार्या अधिकार्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे

अंधेरीतील एका प्लॉटचे बांधकाम न तोडण्यासाठी तक्रारदाराकडे 2 कोटीची मागणी केली होती

मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने 7 आगस्ट 2024 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती

त्यानंतर तारी यांनी एका खासगी व्यक्तीस लाचेचा पहिला हप्ता म्हणून 75 लाख स्विकारण्यास सांगून तेथून पळ काढल्याची महिती पोलिसांनी दिली.

याच लाचेचा गैरलाभ मिळवण्यासाठी तारी यांनी प्रयत्न केल्यानंतर लाच लुचपत विभागाच्या पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

खासगी व्यक्तीकडून तारी यांनी 75 लाखाची रक्कम स्विकारली होती. त्यावेळी 2 खासगी व्यक्तींना पोलिसांनी अटक केली होती. तेव्हा पासून तारी हे फरार होते

दरम्यान अटकपूर्व जामीनासाठी तारी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने तारी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर तारी हे आज पोलिसांसमक्ष हजर झाले

या प्रकरणात तारी यांना लाच लुचपत प्रकरणात अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलिस करत आहेत

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

तटकरे यांचे पालकमंत्री पदाची स्थगिती हटविण्यासाठी शहरात राष्ट्रवादी युवतीची निदर्शने… महिलेला टार्गेट करणाऱ्या विकृतींचा निषेध! महिलांच्या सन्मानासाठी तटकरे यांना पुन्हा पालकमंत्रीपद मिळणे...

तटकरे यांचे पालकमंत्री पदाची स्थगिती हटविण्यासाठी शहरात राष्ट्रवादी युवतीची निदर्शने... महिलेला टार्गेट करणाऱ्या विकृतींचा निषेध! महिलांच्या...

दोषीवर कारवाई केली जाईल शिक्षण आयुक्तांनी दिले आश्वासन… शिक्षक भारती संघटनेचे शिक्षण आयुक्त कार्यालय समोर असंतोष धरणे आंदोलन यशस्वी

दोषीवर कारवाई केली जाईल शिक्षण आयुक्तांनी दिले आश्वासन... शिक्षक भारती संघटनेचे शिक्षण आयुक्त कार्यालय...

कारागृहातील १७५ कैद्यांची महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी… राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवसीय प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानअंतर्गत उपक्रम

कारागृहातील १७५ कैद्यांची महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी... राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवसीय प्रधानमंत्री...

भेंडा बुद्रुक येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

भेंडा बुद्रुक येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न अहिल्यानगर - महिलांनी विविध क्षेत्रात आपले कौशल्य...