राजकारणमराठा आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत मांडणार : खासदार निलेश लंके यांचं आश्वासन ;...

मराठा आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत मांडणार : खासदार निलेश लंके यांचं आश्वासन ; मनोज जरांगे यांची घेतली भेट …!

spot_img

‘मायबाप जनतेमुळे मला केंद्रात जाण्याची संधी मिळाली. या संधीचे सोनं करत मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करावाच लागणार आहे. हा प्रश्न नक्कीच लोकसभेत मांडणार’, असं आश्वासन दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी दिलंय.

मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं, या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांची खासदार लंके यांनी छत्रपती संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं.

खासदार लंके म्हणाले, जरांगे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आमरण उपोषण केलं. त्याच्या या उपोषणाचा माझ्या मतदारसंघातदेखील फायदा झाला. जरांगे यांच्या या आंदोलनामुळे महायुतीला फटका बसल्याचंही खासदार लंके म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...