जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी मराठा समाजाचे नेते ‘संघर्ष योध्दा’ मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात बीड जिल्ह्यातल्या शिरुर अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मराठा आरक्षण प्रकरणी विनापरवाना रास्तारोको आंदोलन केल्याबद्दल जरांगे पाटलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जातंय.
मराठा आरक्षणप्रकरणी सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं दि. १० फेब्रुवारीपासून जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं. मात्र हे उपोषण आज (दि.२६) त्यांनी मागे घेतला आहे. दरम्यान जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले असले तरी साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
इथून पुढे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घेणार असून हो तर माझा बळी घ्या. पण सगेसोयरेंच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करूनच घेणार, या भूमिकेवर जरांगे पाटील आजही ठाम आहेत. दोन दिवसांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असून अंतरवाली सराटी इथं साखळी उपोषण सुरुच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.