लेटेस्ट न्यूज़मनोज जरांगे पाटलांच्या मागे शरद पवार आणि राजेश टोपेंचा हात ? बाबुराव...

मनोज जरांगे पाटलांच्या मागे शरद पवार आणि राजेश टोपेंचा हात ? बाबुराव वाळेकर यांचा पत्रकार परिषदेत आरोप

spot_img

मनोज जरांगे पाटलांच्या मागे शरद पवार आणि राजेश टोपेंचा हात ? बाबुराव वाळेकर यांचा पत्रकार परिषदेत आरोप

अंतरवाली सराटीत पोलिसांवर दगडफेक करण्यास मनोज जरांगे पाटील यांनीच सांगितल्याचा खळबळजनक आरोप त्यांचे जुने सहकारी आणि अंतरवाली सराटी इथं राहणारे बाबुराव वाळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केलाय. जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजेश टोपे यांचाच हात असल्याचं आपण पुराव्यानिशी सांगत आहोत, असा दावादेखील वाळेकर यांनी केलाय.

वाळेकर म्हणाले, की ‘मी अठरा वर्षांपासून सारंगे पाटील सोबत काम करत आहे त्यांचा जुना सहकारी आहे. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी तरुणांचा कसा वापर करायचा, याचा त्यांना चांगलाच अभ्यास आहे. जंरागे पाटील समाजाची दिशाभूल करत आहेत. 2011 साली उघडलेल्या त्यांच्या शिवबा संघटनेचा मीदेखील संस्थापक सदस्य होतो.

अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी येथे एका मुलीवर अत्याचार आणि तिचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यावेळी त्यांनी मला भावनिक केलं तिला न्याय मिळवून द्यायचा आहे, असं म्हणत एक हॉटेलमध्ये त्यांनी बैठक घेतली. त्या बैठकीला फक्त दहा ते बारा जण उपस्थित होते. कोपर्डी प्रकरणातल्या आरोपींवर हल्ला करायचा त्यांनी सांगितलं. मात्र आम्ही हल्ला केल्यानंतर ते घटनास्थळावरून पळून गेले.

जरांगे पाटलांनी दहा ते बारा लोकांची संसार उध्वस्त केले आहेत. कोपर्डी प्रकरणातल्या आरोपींवर हल्ला करून आम्ही जेलमध्ये गेलो मात्र प्रसिद्धी जरांगे पाटलांना मिळाली. आमच्याकडे सर्व पुरावे असून योग्य वेळी ते उघड करणार आहेत, असंदेखील वाळेकर यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...