गुन्हेगारीमद्य प्राषन करुन मारहाण ; जळकेच्या पोलीस पाटलाविरुध्द नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा...

मद्य प्राषन करुन मारहाण ; जळकेच्या पोलीस पाटलाविरुध्द नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

spot_img

दारु पिऊन एकाला मारहाण केल्याप्रकरणी नेवासे तालुक्यातल्या एका पोलीस पाटलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी बळीराम दत्तात्रय नाईक (वय-50 वर्षे धंदा-शेती रा-जळके व ता. नेवासा जिल्हा – अहमदनगर) यांनी दिलेल्या जबावावरुन पोलीस पाटील अशोक कारभारी पुंड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, बळीराम नाईक यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर पोलिसांनी त्यांचा जबाब घेतला. नाईक यांनी सांगितलं, की ते त्यांची पत्नी सुनिता, दोन मुलं आदिनाथ व चैतन्य असे एकत्र राहछ असून शेती करुन परिवाराची उपजिविका भागवताहेत. त्यांचा चुलत मावस भाऊ अशोक कारभारी पुंड हा त्यांच्या जवळच्या जळके बुद्रूक गावामध्ये राहवयास असून त्याला दारुचं व्यसन आहे.

दि-06.04.2024 रोजी 08.15 वा सुमारास नाईक हे गावातल्या मारुती मंदीराजवळ असतांना तेथे अशोक कारभारी पुंड हा दारु पिऊन आला व विनाकारण शिवीगाळ दमदाटी करु लागला. नाईक यांनी त्याला समजावून सांगत होते, की ‘तु दारु पिलेला असून मला विनाकारण शिवीगाळ करु नको’. त्यावर तो पुन्हा मला शिवीगाळ करु लागला. तो दारु पिलेला असल्यानं नाईक त्या ठिकाणावरुन घरी निघून गेले.

रात्री 08.45 वाजण्याच्या सुमारास नाईक यांच्या राहत्या घरासमोर ते व त्यांची पत्नी सुनिता असे असतांना तेथे अशोक कारभारी पुंड हा मोटार सायकलवरुन आला. तो दारुच्या नशेत होता. आल्यानंतर लागलीच त्याने त्याचे जवळ असणारे ऑनलाईन मिळणारे फोल्डींग लोखंडी स्टिकने नाईक यांच्या डोक्यावर दोन ठिकाणी जोरात मारल्याने नाईक डोक्यावर जखमी झाले.

त्यानंतर त्याने त्याच स्टिकने नाईक यांच्या पाठीत जोरजोरात मारले. त्यावेळी नाईक यांची पत्नी सुनिता ही सोडविण्यासाठी मध्ये आली असता तिला अशोक पुंड याने तोंडावर हाताने दोन चापटी मारल्या. आम्ही आरडाओरड केल्याने त्याठिकाणी आमचे शेजारी राहणारे शुभम त्रिंबक नाईक, विजय दत्तात्रय नाईक असे तेथे आले. त्यांनी अशोक पुंड याने मला आणखी मारहाण करु नये म्हणून त्याला बाजूला केले व त्याचे हातातली स्टिक काढून घेतली.

दरम्यान, सदर ठिकाणी अशोक पुंड याचा चुलत भाऊ प्रमोद एकनाथ पुंड (रा. जळके बुद्रूक ता- नेवासा) हा तेथे आला व त्याने अशोक पुंड याची TVS मोटार सायकल घेऊन गेला. त्यांनतर जखमी नाईक यांना शुभम त्रिंबक नाईक, विजय दत्तात्रय नाईक, तुळशीराम हरिश्चंद्र झगरे अशांनी प्रथम ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा व त्यांनतर नेवासा फाटा इथल्या खासगी रुग्णालयात ॲडमिट केलं.

दरम्यान, काल दि. 06. 04. 2024 रोजी रात्री 08.15 वा सुमारास जळके बुद्रूक गावात मारुती मंदीराजवळ अशोक कारभारी पुंड (रा. जळके बुद्रूक ता. नेवासा) याने दारु पिऊन विनाकारण शिवीगाळ केली. म्हणून त्यास समजावून सांगितल्याचा राग मनात धरुन रात्री 08.45 वा सुमारास नाईक हे त्यांच्या घरासमोर असतांना तेथे अशोक कारभारी पुंड याने त्याचे TVS मोटार सायकल (नंबर सांगता येत नाही ) वरुन येऊन ऑनलाईन मिळणारे फोल्डींग लोखंडी स्टिकने माझ्या डोक्यात दोन ठिकाणी मारुन जखमी करुन दुखापत केली. तसेच पाठीत मारुन दुखापत केली.

सदर घटनेबाबत काल शनिवार दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सदर घटनेची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना मिळताच जाधव यांनी तातडीने शासकीय वाहन जळका बुद्रुक येथे पाठवलं. त्यावेळी जळका बुद्रुक येथील पोलीस पाटील अशोक पुंड हे मद्य प्राषन केल्याच्या अवस्थेत आढळून आल्यानं त्यांची काल रात्री मद्यप्राशन केल्याबाबत वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाने हे करीत आहेत. पोलीस पाटलाविरुध्द गुन्हा नोंद झाल्यानंतर सदर गुन्ह्याचा अहवाल कारवाईकामी उपविभागीय अधिकारी (प्रांत) अहमदनगर यांना तातडीने सादर करण्यात आला.

कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही …!

गुन्हेगार कितीही मोठा असला कोणाच्याही ओळखीचा असला तरी त्याने केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला कटर शिक्षाही केली जाणारच कोणी कितीही मोठ्या घरातला असला तरी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नेवासा पोलिसांकडून कठोर पावले उचलण्यात येतील. कोणी कितीही मोठा असला तरी कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही.

धनंजय अ. जाधव,
पोलीस निरीक्षक,
नेवासा पोलीस स्टेशन.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दारूची बाटली व पाच हजार रुपये रोख लाच घेतल्याबद्दल तीन पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ने केला गुन्हा दाखल..!

दारूची बाटली व पाच हजार रुपये रोख लाच घेतल्याबद्दल तीन पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने...

गॅस कंपनीच्या ठेकेदाराकडे तब्बल १० लाखांच्या खंडणीची मागणी.. एमआयडीसी पो.स्टे.ला गुन्हा दाखल..!

गॅस कंपनीच्या ठेकेदाराकडे तब्बल १० लाखांच्या खंडणीची मागणी.. एमआयडीसी पो.स्टे.ला गुन्हा दाखल अहिल्यानगर (दि.२४ प्रतिनिधी):-एमआयडीसीत...

अहिल्यानगर एसीबी ची मोठी कारवाई. .! लाच घेतल्याप्रकरणी पं.समितीच्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल…

अहिल्यानगर एसीबी ची मोठी कारवाई. .! लाच घेतल्याप्रकरणी पं.समितीच्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल... यशस्वी सापळा...