युवा विश्वमतदार राजा, सावधान ! तुला विकत घ्यायला सज्ज झालीय यंत्रणा...!

मतदार राजा, सावधान ! तुला विकत घ्यायला सज्ज झालीय यंत्रणा…!

spot_img

आगामी विधानसभेच्या निवडणुकीची अधिसूचना निघायला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या निवडणुकीच्या तयारीसाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच ‘फिल्डिंग’ लावायला सुरुवात केली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखायला राजकीय मंडळींनी सुरुवात केली आहे. यासाठी विशिष्ट प्रकारच्या अशा मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आम्हाला जागरुक मतदार राजाला सजग करायचं आहे, की मतदार राजा, सावधान ! तुला विकत घ्यायला यंत्रणा सज्ज झाली आहे. 

नुकत्याच अगदी काहीच दिवसांपूर्वी शामरावांनी नियुक्त केलेल्या ‘पगारी कार्यकर्त्यां’ची गुप्त बैठक घेतली. आता हा शामराव कोण, हे मात्र तुमचं तुम्हीच पहा. कारण इतकं उलगडून सांगायला तुम्ही दूधखुळे नक्कीच नाहीत. हा शामराव पगारी कार्यकर्त्यांना म्हणाला, ‘जोपर्यंत मी जीवंत आहे, तोपर्यंत तुम्हाला कोणीच इथून ‘काढू’ शकत नाही, कामाला लागा’.

या पगारी कार्यकर्त्यांचं काम एवढंच, की दिवसभरात आपल्या शामरावांच्या विरोधात कोण कोण काय काय बोलतं, याचं संध्याकाळी शामरावाकडे रिपोर्टिंग करायचं. तर मग आपला पगार दर महिन्याला वेळेवर मिळावा, त्यामध्ये खंड पडू नये, यासाठी हे पगारी कार्यकर्ते शामरावाकडे खोटं रिपोर्टिंग करत नसतील हे कशावरुन?

आम्हाला या शामरावचं एक समजत नाही, कार्यकर्त्यांना पगार देऊन स्वतःविषयी कोण कोण काय काय भलतं वाईट बोलतंय, हे ऐकायचं आणि ते वाईट ऐकूनच रात्री झोपी जायचं. म्हणजे पैसे देऊन अक्कल विकत घेतल्यासारखाच ही प्रकार नाही का? एका अर्थानं पगारी कार्यकर्त्यांवर लाखो रुपये उधळून ‘नकारात्मक ऊर्जा’ आत्मसात करुन घेणारा हा शामराव खरंच बुद्धिमान आहे का, असाच प्रश्न आमच्यासह अनेकांना पडला आहे.

हा शामराव राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यांत, जिल्ह्यांतल्या प्रत्येक तालुक्यांत आणि तालुक्यांतल्या प्रत्येक गावागावांत आहे. या शामरावच्या डोक्यात एक भन्नाट ‘आयडिया’ची कल्पना आली आणि एफ. ओ. सी. अशी अनोखी मतदार यादी तयार करण्याचं फर्मान त्यानं पगारी कार्यकर्त्यांना सोडलं.

एफ म्हणजे फॉल्टी. या पहिल्या प्रकारच्या यादीत शामरावला न मानणाऱ्या मतदारांचा समावेश आहे. या मतदारांना शामराव अजिबात डोकं लावत नाही. ओ म्हणजे ओरिजनल मतदार. या मतदाराचं बरंच काही शामरावकडे अडकलेलं आहे. त्यामुळे हे मतदार दुसऱ्या कोणालाच मतं देणार नाहीत, असा ठाम विश्वास शामरावला आहे. एका अर्थानं शामरावानं या मतदारांना गृहित धरुनच टाकलं आहे.

सी कॅटेगिरी अर्थात विशिष्ट जातीतला आणि स्वाभिमान गहाण ठेवून पाचशे हजारांमध्ये स्वतःचं मत विकणारा मतदार. चतुर शामरावनं या तिसऱ्या प्रकारच्या यादीत हा मतदार ठेवला आहे.

हा मतदार निवडणुकीत नक्की विजय मिळवून देतो, याची शामरावला ठामपणाची खात्री आहे. हा मतदार डोळ्यासमोर ठेवून या मतदारांना एका मताची पाचशे, हजार किंवा त्यापेक्षा जास्त किंमत देऊन ती सारी मतं विकत घेण्याचा मनसुबा शामरावनं रचला आहे. आता विकत मतं घेऊन शामराव जर निवडून आला तर तो कोणाच्याच बापाचं ऐकणार नाही, हे खरं तर जळजळीत वास्तव आहे. त्यामुळे हजार पाचशे रुपयांत आपलं मत विकायचं की प्रामाणिकपणे योग्य उमेदवाराला मत द्यायचं, हे ठरवणं मतदार राजा, खरं तर तुझ्याच हातात आहे. बघ बाबा, जरा नीट विचार कर. कारण तू मतदार राजा आहेस.

ताजा कलम :

या लेखाचा कोणत्याही राजकीय पक्ष आणि नेत्याशी काडीमात्र संबंध नाही. जर तसा संबंध कोणाला आढळून आलाच तर तो केवळ योगायोग समजावा. धन्यवाद.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...