राजकारणमतदार राजा! ठरला बरं तुझ्या मतांचा 'रेट' ...! आता बघ बाबा...

मतदार राजा! ठरला बरं तुझ्या मतांचा ‘रेट’ …! आता बघ बाबा तुझं तुच…! स्वाभिमानी रहायचं की अनमोल मत विकायचं…?

spot_img

काल परवा शामरावचा (एक प्रातिनिधिक व्यक्तिमत्त्व) एक कार्यकर्ता भेटला. खूपच ‘कॉन्फिडन्स’मध्ये दिसत होता. म्हणाला, ‘यावेळच्या विधानसभा निवडणुकीत आमच्या साहेबांनी ‘स्टॅटेजी’ बदलली आहे. आमचे साहेब एका मताचे चक्क दहा हजार रुपये द्यायला तयार आहेत. यासाठी दोनशे ते अडीचशे कोटींचा चुराडा करण्याची आमच्या साहेबांची तयारी आहे’.

अर्थात त्या कार्यकर्त्यानं केलेली ही फक्त चर्चा आहे. कदाचित संभाव्य प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये गोंधळ व्हावा, या उद्देशानं ही चर्चा शामरावांनी पसरवली असावी, असा आम्हाला संशय आहे. ते ‘खोटा नरेटिव्ह’ की काय म्हणतात ना, कदाचित तो हाच असावा. या साऱ्या पार्श्वभूमीवर आम्हाला एकच सांगावसं वाटतं, की मतदार राजा, ठरला बरं तुझ्या मतांचा ‘रेट’. आता बघ बाबा तुझं तुच. स्वाभिमानी रहायचं की अनमोल मत विकायचं.

‘या निवडणुकीत आमचे साहेब पुन्हा अपक्ष लढणार आहेत, अशी पुडीदेखील या कार्यकर्त्यानं यावेळी सोडली. आता हे असं जर होणार असेल तर कुठे गेली नैतिक मूल्यं? कुठे गेला तो सेवाभाव? कुठे गेला तो प्रामाणिकपणा? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होणं स्वाभाविक आहे.

आगामी विधानसभा निवडणूक दृष्टिकोनातून जिल्ह्याच्या प्रत्येक मतदारसंघात असं ‘प्लॅनिंग’ सुरु आहे. अशा शामरावांचा एक हक्काचा मतदार, त्याला आपण एक गठ्ठा मतं असणारा मतदार असंही म्हणू शकतो. त्या हक्काच्या मतदारांंव्यतिरिक्त कमी पडणारी मतं विकत घेण्याची ‘स्टॅटेजी’ शामरावांसारखे निर्लज्ज राजकारणी राबवणार असतील, या ‘स्टॅटेजी’ला मतदार बळी पडणार असतील आणि पुन्हा एकदा शामरावांसारखेच निष्क्रिय, मतलबी, संधी साधू आणि सत्तेचा दुरुपयोग करणारेच लोकप्रतिनिधीच जर सत्तेवर येणार असतील तर संबंधित मतदार संघाचं नक्कीच वाटोळं होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. पण अजूनही वेळ गेलेली नाही. मतदार राजा, तू तुझा स्वाभिमान मात्र गहाण ठेवू नकोस.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माळशिरस नगरपंचायत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..!

माळशिरस नगरपंचायत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..! माळशिरस: - माळशिरस नगरपंचायतीचे कर निर्धारण अधिकारी विकास गोरख पवार...

IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल

IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल नवटाकेंविरोधात फसवणूक...

दौलत (नाना ) शितोळे ना राज्यमंत्री दर्जा तर भाऊसाहेब शिंदे ना विधान परिषद मिळणारं

दौलत (नाना ) शितोळे ना राज्यमंत्री दर्जा तर भाऊसाहेब शिंदे ना विधान परिषद मिळणारं मुंबई...

उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुध्द कारवाईसाठी पोलीस पथक नेमावं: वडारवाडी ग्रामपंचायतीची मागणी…!

उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुध्द कारवाईसाठी पोलीस पथक नेमावं: वडारवाडी ग्रामपंचायतीची मागणी...! अहिल्यानगरजवळ असलेल्या भिंगारलगतच्या वडारवाडी ग्रामपंचायत...