भारतीय दलित महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर… विजय शेलार यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड…
भारतीय दलित महासंघाच्या वतीने शहरातील शासकीय विश्रामगृह याठिकाणी बैठक पार पडली या बैठकीमध्ये जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडले आहेत बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील उमाप उपस्थित होते.
बैठकीमध्ये जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली आसुन जिल्हाध्यक्षपदी विजय शेलार यांची निवड करण्यात आली… जिल्हा उपाध्यक्ष म्हणून साहेबराव काते यांची निवड करण्यात आली तसेच कार्याध्यक्ष पंडित खुडे, महिला उत्तर नगर जिल्हाध्यक्षा हिना उबाळे तर दक्षिण महिला जिल्हाध्यक्ष कमल जगधने यांची निवड करण्यात आली.
पाथर्डी तालुका अध्यक्षपदी विठ्ठल शिरसाट, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष दीपक भांड यांसह संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी या बैठकीमध्ये भारतीय दलित महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे… बैठक संपल्यानंतर संस्थापक अध्यक्ष सुनील उमाप यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
भारतीय दलित महासंघ इथून पुढे अन्याय अत्याचारविरोधात पूर्ण ताकतीने काम करणार आसुन समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम करणार असल्याचा मानस नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला
यावेळी संपूर्ण जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी आणि भारतीय दलित महासंघ पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…