भवानी माता मंदिरात महालक्ष्मी अष्टक व देवींच्या गाण्यांचा कार्यक्रम साजरा पुणे शहर भवानी पेठेतील बापूसाहेब पवार प्राथमिक शाळेचा अनोखा उपक्रम
पुणे शहर: भवानी पेठेतील बापूसाहेब पवार प्राथमिक शाळेत नवरात्रातील ललितापंचमी चा योग साधून भवानी पेठेतील पुणे येथील भवानी मातेच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे देवीच्या गाण्याचा कार्यक्रम सोमवारी दिनांक सात ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला.
यावेळी गणपती स्तवन, महालक्ष्मी अष्टक, भजन, परड्या घेऊन देवीचा जोगवा, गोंधळ, टिपऱ्या घेऊन गाणी, तबलावादक मूर्तीस्वामी, पेटीवादक बेंगरूट सर यांच्या साथीने इ. ४ थी च्या विद्यार्थ्यांनी सादर केला.
यावेळी विद्यार्थिनींनी देवींच्या विविध रूपातल्या अवतारातला पोशाख परिधान केला होता. दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी व मंदिराचे पुजारी मेढेकर काकांनी विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिल्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका कु-हाडे हेमलता व माजी मुख्याध्यापिका स्मिता पुजारी, ढगारे मॅडम, बनसोडे मॅडम सर्वांनी विद्यार्थ्यासोबत कार्यक्रमात भाग घेतला.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सचिव कविताताई पवार व सुजाताताई पवार व प्राजक्ता पवार,सीमा वाघुलकर उपस्थित होत्या.