गुन्हेगारीभरदिवसा १० तोळ्यांवर मारला डल्ला ; कुठं घडलीय घटना, वाचा सविस्तर...!

भरदिवसा १० तोळ्यांवर मारला डल्ला ; कुठं घडलीय घटना, वाचा सविस्तर…!

spot_img

गेल्या सोमवारी (दि. १८) रोजी दुपारी २.३० सुमारास शिंदे वस्ती वरील राजेंद्र अंबादास शिंदे यांची पत्नी वाळकी येथील आठवडे बाजारसाठी गेल्या होत्या. राजेंद्र शिंदे काम निमित्तानं बाहेर गावी गेले होते. त्यांचा मुलगा घराच्या मागच्या बाजूला शेतात काम करत होता. याच संधी फायदा घेत अज्ञात चोरट्यानं बंद घराचं कुलुप कोंडा तोडून घरात प्रवेश करत घरातला रोख रक्कम २० हजार रुपये आणि १० तोळे सोने असा मुद्दे माल चोरुन नेला. दिवसा ढवळ्या ही चोरी झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

घटनास्थळी नगर तालुका पोलीस श्वास पथकास पाचारण करून माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु थोड्या अंतरावर चोरांनी गाडी वरून पलायन केले. दुचाकीच्या टायर्सची चिन्हे दिसली. पोलिसांनी घटनास्थळाचा  पंचनामा केला. 

या प्रकरणी राजेंद्र अंबादास शिंदे यांनी फिर्याद दाखल केली. या आधी देखील अशाच पद्धतीने अशोक धर्मा जावळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नंबर ७०/२०२४ यांच्या घरी ३१/०१/ २०२४ दुपारी दोन तिन दरम्यान घराचा कुलुप कोंडा तोडून घरात आता प्रवेश करून चार तोळे मुद्दे माल चोरी गेले होते. तदनंतर

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दहिगाव वाळकी रोडला असणारी रामवाडी वस्तीवर दि. १/०२/२०२४ बाळासाहेब जाणकु हिंगे यांचे नवीन घराचं ४० हजार रुपये बांधकाम साहित्याची  रात्री दीडच्या सुमारास चोरी झाली. याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...