तब्बल ५३ वर्षानंतर जगन्नाथ पुरीची रथयात्रा दोन दिवसांची होत आहे. काल अर्थात रविवारी (दि. ७) या रथयात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतरही दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (दि. ८) रथ ओढण्यासाठी लाखो भाविकांचा सहभाग दिसून आलाय. दरम्यान, आज दिवसभरात भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा मैय्या या तिघांचे तीन रथ गुंडीचा मंदिरात पोहोचणार आहेत.
महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगवान जगन्नाथपुरी इथं उपस्थित राहून रथ ओढला. सूर्यास्तानंतर रथ ओढला जात नाही. त्यामुळे ज्या जागेवर आहे, तिथंच रथ थांबवण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज दि. ८ रोजी पुन्हा रथयात्रा सुरू झाली. या रथयात्रेत दहा लाख भाविक सहभागी झाले आहेत. रविवारी झालेल्या चेंगराचेंगरीत एका भाविकांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले होते.
तीनही रथ संथगतीने पुढे सरकत आहेत. रथयात्रेत प्रचंड गर्दी आहे लोकांनी तीनही रथांच्या भोवती वेढा घातलेला आहे. भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा मैया यांचे रथ संथ गतीने पुढे सरकत आहेत.
राजा दिव्या सिंह देव यांनी ‘अशी’ पूर्ण केली परंपरा…!
जगन्नाथ पुरीचे राजा दिव्या सिंह देव यांनी सोन्याचं हँडल असलेल्या झाडूनं भगवान जगन्नाथांचा रथ झाडून घेतला. अनेक वर्षांची ही परंपरा आहे. ती परंपरा पूर्ण करण्याचं काम राजा दिव्या सिंह देव यांनी केलं.