ब्रेकिंग न्युज…!
बहुचर्चित पांगरमल दारुकांडातल्या जितू गंभीर जाकीर शेख यांच्यासह चौघाजणांचा जामीन मंजूर…!
नगर तालुक्यातल्या पांगरमल परिसरात जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत दारु कांड घडलं होतं. या प्रकरणात जितू गंभीर, जाकीर शेख, याकूब शेख व दादा वाणी या चौघाजणांचा जामीन मंजूर झाला आहे.
साधारणतः सात वर्षांपूर्वी घडलेल्या या गुन्ह्यात आरोपीना अटक केली होती, तेव्हापासून आरोपी अटक होते. मात्र कोर्टानं नुकताच या सर्वांची जामिनावर मुक्तता केली आहे.
सदर गुन्ह्यात जाकीर शेखच्या वतीने ऍड. सतीश गुगळे तर जितू गंभीर, दादा वाणी व याकूब शेख यांच्या वतीने ऍड. महेश तवले, ऍड.सरिता साबळे व ऍड. सतीश गिते यांनी कामकाज पाहिले.