महागड्या आणि ब्रँडेड कारमध्ये प्रवास करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असतं. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे तसा योग जुळून येत नाही. परंतु काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही त्यासाठी तुम्हाला एक पर्याय उपलब्ध करून देत आहोत. या पर्यायानुसार तुम्ही सेकंड हॅन्ड कार अवघ्या 1 लाख 35 हजार रुपयांना तर 16 हजार रुपयांमध्ये रिक्षा विकत घेऊ शकता. कसा आणि काय आहे जुगाड, हे जाणून घेण्यासाठी नक्की शेवटपर्यंत वाचा.
हल्लीच्या इंधन वाढीच्या समस्येमुळे सर्वजण हैराण झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे चार चाकी वाहन विकत घेणे आणि ते चालवणं हे आजच्या परिस्थितीत थोडसं कठीण झालं आहे. मात्र बँकेने ओढून आणलेल्या चार चाकी वाहनांची विक्री सध्या देशाची राजधानी नवीदिल्लीत सुरू आहे. तुम्ही जर सेकंड हॅन्ड कार विकत घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी अवश्य प्रयत्न करा.
बँकांचे हप्ते थकल्यामुळे चार चाकी वाहन वसुली प्रतिनिधी ओढून नेतात. ती वाहनं जरी सेकंड हॅन्ड असली तरी चांगल्या अवस्थेत असतात. त्यामुळे कार विकत घ्यायचे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर जुन्या आणि चांगल्या अवस्थेत असलेल्या कार विकत घेऊन सामान्य आणि मध्यम वर्गातील प्रत्येकाला हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी चालून आली आहे. आजच्या महागाईच्या दुनियेत या संधीचा लाभ घ्यायला काहीच हरकत नाही.