बुद्ध पौर्णिमेनिमित्त निलक्रांती चौक मित्र मंडळातर्फे थंडगार शितपेय आणि सरबताचे वाटप..
दरवर्षीप्रमाणे निलक्रांती चौक मित्र मंडळातर्फे थंडगार शितपेय आणि सरबताचे वाटप करण्यात आली सदर कार्यक्रमास ॲड. संदीप पाखरे (नोटरी पब्लिक भारत सरकार), शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, सलीम शेख, मेजर कैलास ठुबे, अशोक पारदे, अमोल पाडळे, अक्षय साळवे, रामा साळवे, अमोल साळवे, संदीप साळवे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ॲड. संदीप पाखरे म्हणाले की, निलक्रांती चौक मित्र मंडळ नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असतात, तथागत गौतम बुद्ध यांच्या पौर्णिमेनिमित्त दरवर्षी सामाजिकतेची जाणीव ठेवून विविध उपक्रमाद्वारे आणि अत्यंत धार्मिकपणे बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. ही अत्यंत आदर्श वाटेल अशी बाब असून निलक्रांती चौक मित्र मंडळ नेहमीच अशा कार्यक्रमाद्वारे समाजाला आदर्श वाटेल याप्रमाणे सामाजिकतेचा ऐक्याचा एक मोलाचा संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो याबाबत मंडळाच्या सर्व सदस्यांना धन्यवाद देऊन बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्व बौद्ध धर्मीयांना यांना आणि बौद्ध अनुयायांना शुभेच्छा दिल्या..
कार्यक्रमात प्रथमतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यांना उपस्थित सर्वांच्या वतीने अभिवादन करून बुद्ध वंदना घेण्यात आली.. तदनंतर थंडगार शितपेय आणि सरबताचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश गायकवाड, विजय साळवे, यश साळवे, किरण भादवे, रोहित शिरसाठ, मनोज साळवे, सुजित साळवे, प्रवीण भिंगारदिवे, रोहित साळवे, प्रशांत भोसले आदींनी सहकार्य केले.