बिल्डर विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्रकुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्डशी ‘कनेक्शन’ असल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात समोर आला आहे. सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे छोटा राजनशी संबंध होते. भावासोबत असलेल्या संपत्तीच्या वादात बिल्डर विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी छोटा राजनची मदत घेतली असल्याचं बोललं जातंय.
दरम्यान, अजय भोसले या व्यक्तीच्या हत्या प्रकरणी सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. मात्र याप्रकरणी मोक्का लावणं अपेक्षित असताना पोलिसांनी केवळ आयपीसी कलम लावून गुन्हा दाखल केला.
पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात (दि. १९) पहाटे अल्पवयीन मुलानं जी अलिशान कार चालवली, ती बंगळूरहून पुण्यात आणण्यात आली होती. टॅक्स न भरल्यामुळे आरटीओनं या कारची नोंदणी केली नव्हती. तरी देखील ही गाडी रस्त्यावर फिरत होती. विशेष म्हणजे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही वस्तुस्थिती असल्यास मान्य करत या प्रकरणीही कारवाई केली जाईल, असं सांगितलं.