राजकारणबारस्कर महाराजांनी 'त्या' आरोपांसाठी 40 लाख रुपये घेतले : मनोज जरांगे पाटलांची...

बारस्कर महाराजांनी ‘त्या’ आरोपांसाठी 40 लाख रुपये घेतले : मनोज जरांगे पाटलांची माहिती

spot_img

अजय बारस्कर नावाचा इसम हा महाराज नाही. त्यानं संत तुकाराम महाराज आणि माझ्या कुटुंबाबद्दल काही बोलू नये. अन्यथा त्यांना ते सोपं जाणार नाही. माझ्यावर आरोप करण्यासाठी बारस्कर यांनी 40 लाख रुपये घेतले आहेत, अशी खळबळजनक माहिती मराठा समाजाचे नेते ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

अंतरवाली सराटी इथं विविध वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना जरांगे पाटलांनी बारस्कर यांच्याबद्दल अनेक प्रकारचे गौप्यस्फोट केले आहेत. ते म्हणाले, एका बंगलोरच्या महिलेला बारस्कर यांनी फसविलं आहे. ती महिला लवकरच अंतरवाली सराटी इथं येणार आहे. बारस्कर यांच्या मनात महिलांविषयी अजिबात आदर भाव नाही. बारस्कर यांनी सरकारच्या आडून व्यर्थ बडबड करु नये.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या इसमापासून चार हात लांब रहावं. अन्यथा त्यांचा पक्ष धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. बारस्कर यांच्याविषयी अनेक प्रकारची माहिती आमच्याकडे येत नाही. बारस्कर हे महाराज नाहीत. त्यांनी अनेक लोकांची फसवणूक केली आहे. दरम्यान, बारस्कर हे जरांगे पाटलांवर आरोप केल्यामुळे चांगलेच प्रसिद्ध झाले आहेत.

बारस्कर हे एका रात्रीत प्रकाशझोतात आले आहेत. मोठमोठे न्यूज चॅनल त्यांच्या एक एक तास मुलाखती घेत आहेत. यासाठी मला आयुष्याची 19 वर्षे खर्ची घालावी लागली. परंतू पैशांच्या जोरावर बारस्कर हे बिनबुडाचे आरोप करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे!

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त...