नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या गोधेगाव इथं राहणाऱ्या शिवाजी दादासाहेब जाधव (मयत) याच्या शेती वाटपाच्या कारणावरुन सतत होणाऱ्या भांडण-तंट्याच्या त्रासाला कंटाळून मयत शिवाजीचे वडील दादा सारंगधर जाधव यांनी शिवाजीच्या डोक्यावर सुमारास फळीनं मारहाण करुन त्याचा खून केला. मंगळवारी (दि. 14) रोजी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी मयत शिवाजीची आई अलका दादासाहेब जाधव हिच्या फिर्यादीवरुन नेवासे पोलीस ठाण्यात (गु.र.नं. 483/2024) भादंवि क. 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. जन्मदात्या बापानंच मुलाचा खून केला आहे. या घटनेमुळे नेवासे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्रसिंग ससाने हे करीत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुनील पाटील यांनी घटनास्थळास भेट दिली.