राजकारणबापरे! 'या' वकील साहेबांनी महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनाच दिली नोटीस...

बापरे! ‘या’ वकील साहेबांनी महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनाच दिली नोटीस …!

spot_img

भूमाफियांचं ऐकून सामान्य माणसावर आवश्यकतेपेक्षा जास्त अधिकार गाजवीत असल्याचा आरोप करत अहिल्यानगरचे सुप्रसिद्ध वकील ॲड.शिवाजी डमाळे (अहमदनगर, 9850290237) यांनी चक्क महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनाच नोटीस दिली आहे.

या नोटिशीत ॲड. डमाळे यांनी म्हटलं आहे, की IPC Section 21 अंतर्गत भारतातल्या तमाम सरकारी नोकर Public servants आणि तमाम जनतेस या जाहीर नोटीसद्वारे सुचित करण्यात येते की, आयुक्त डॉ. जावळे यांनी आमचे अशील प्रताप निंबाळकर आणि भरत निंबाळकर यांच्या स्वतःच्या जागेवर गणपती बाप्पांच्या मूर्तींना पावसापासून वाचण्यासाठी पत्र्याचं शेड उभारले आहे. परंतू भूमाफियांच्या तक्रार अर्जावरून आयुक्त डॉ. जावळे यांनी शेड पाडण्यासाठी नोटिसांवर नोटीसा पाठवून निंबाळकरांना हैराण केलं आहे.

डॉ. जावळे आपण आणि प्रशासनातले अधिकारी जनतेचे सेवक Public servant आहात. जनतेला सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आपली कायद्याप्रमाणे नेमणूक करण्यात आलेली आहे.

आपण जनतेचे सेवक आहात. जनता आपली मालक आहे. आपण आपल्या कार्यालयातले आपल्या आदेशानुसार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तुम्ही साहेब, सर, अधिकारी आहात. आपण जनतेचे अधिकारी नाहीत.

आपलं कार्यालय जनतेच्या मालकीचं आहे. कार्यालयातील सर्व साहित्य, अगदी इमारत, खुर्च्या, टेबल, तुम्ही बसता ती खुर्चीसुध्दा जनतेच्या मालकीची आहे.

आपण जोपर्यंत नोकरीत आहात, किंवा अहमदनगर महानगरपालिका येथे बदलीवर आहात, तोपर्यंत ती सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे.

आपल्या नोकरीच्या काळात आपल्याला दिलेल्या अधिकारापेक्षा जनतेची सेवा करण्याची आपली जबाबदारी जास्त आहे. निंबाळकरांनी बांधलेले शेड म्हणजे फारच मोठा गुन्हा नाही. उलट भूमाफियांचे ऐकून तुम्ही IPC Section 166 अन्वये गुन्हा करत आहात.

अहमदनगर शहरातल्या भूमाफियांना आपण संरक्षण देत आहात. भूमाफियांच्या गैरककृत्यांमुळे अनेक नागरिक त्रस्त आहेत. या नोटिसीद्वारे आपणास आणि देशभरातील Public servants यांना कळविण्यात येते, आपण भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या चौकटीत राहून आणि कायदेशीर मार्गानं जनतेची सेवा करावी, असा सबुरीचा सल्ला दिला जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...