ब्रेकिंगबांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

spot_img

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

सावेडीतील प्रकल्पात टाकाऊ साहित्य, कचऱ्यातून पेव्हर ब्लॉक तयार करणार;

रस्त्यावर, मोकळ्या जागेत पाडकामाचा कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई: आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे..!

अहिल्यानगर – शहरातील बांधकाम व पाडकामाचा राडारोडा, टाकाऊ साहित्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने सावेडी येथील कचरा डेपोच्या जागेत सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प उभारला आहे. सुमारे ४.७० कोटी रुपये खर्चून उभारलेला व ५० टन क्षमता असलेला हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून, त्याची चाचणी सध्या सुरू आहे. खासगी संस्थेमार्फत हा प्रकल्प चालवण्यात येणार आहे. त्यातून निर्मिती होणाऱ्या उत्पादनांची विक्री होऊन त्यातून महानगरपालिकेला उत्पन्न मिळणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

महानगरपालिकेने सन २०२२ मध्ये या प्रकल्पासाठी कार्यारंभ आदेश दिला होता. काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प रखडला होता. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी अडचणींवर मार्ग काढून प्रकल्पाचे काम पूर्ण करून घेतले आहे. शहरात इमारतीचे पाडकाम व बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी वाळू, सिमेंट, गज असा विविध प्रकाराचा कचरा, रॅबीट साचले जाते. अशा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी व त्याचा अधिकाधिक पुनर्वापर करण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातील यंत्राद्वारे आलेल्या सी अँड डी वेस्टचे प्रथम विलगीकरण होईल. त्यानंतर या साहित्यापासून पेव्हर ब्लॉक तयार करून त्याची विक्री केली जाईल. त्यातून महानगरपालिकेला आर्थिक उत्पन्न मिळेल, तसेच शहरात इतरत्र साचणाऱ्या राडारोड्याचे प्रमाण कमी होईल, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शहरात जिथे इमारत पडण्याचे किंवा बांधण्याचे काम सुरू असेल, अशांना पाडकामाचा कचरा इतरत्र टाकता येणार नाही. त्यांना हा कचरा प्रकल्पात आणून टाकावा लागणार आहे. रस्त्याच्या कडेला, अथवा मोकळ्या जागेत, इतरत्र कुठेही बांधकाम व पाडकामाचा कचरा टाकल्यास संबंधितांवर महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे!

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त...